प्रतिनिधी: निवडणुकीची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी 6 वाजता शमली.पण या रणधुमाळी शमेच्या पूर्वसंध्येला गर्लगुंजीत एकच नारा झाला, तो श्री विठ्ठल हलगेकर नावाचा.
होय, सोमवारी सायंकाळी प्रचाराची रणधुमाळी थांबली. गुप्त गाठीभेटीना आगामी 24 तासात वेग येणार आहे. पण रणधुमाळीच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विठ्ठल हलगेकरांनी संपूर्ण खानापूर तालुक्याचा गेल्या पंधरा दिवसात दौरा करत शेवटचा दिवस आपल्या कर्मभूमीत घातला. या ठिकाणी एकच एल्गार झाला तो विठ्ठल हलगेकर सरांचा.
गर्लगुंजी ही श्री विठ्ठल हलगेकर सरांची कर्मभूमी आहे. 1985 मध्ये विनाअनुदानित शिक्षण संस्था असलेल्या माऊली गर्ल्स विद्यालयात गेली. 36 वर्षे शिक्षक मुख्याध्यापक सेवा बजावून अनेक विद्यार्थी घडवले आहेत. शिवाय सरांचे ते मामेगाव व अनेक नातेवाईक असलेला गोतावळा मोठा आहे. मागील निवडणुकीत स्वतःचे गाव असताना देखील त्या ठिकाणी सरांना जाणे शक्य झाले नाही. पण आता ती उणीव भरून काढण्यासाठी येथील अनेक नातेवाईक शिवाय विद्यार्थी स्वतःहून सरांना निवडून आणण्यासाठी एकत्र झाले आहेत. विठ्ठल हलगेकर यांनी गेल्या 36 वर्षात हजारो विद्यार्थी या ठिकाणी घडवले आहेत. त्यामुळे आता गर्लगुंजीतील हजारो विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक वर्ग यांनी आता गुरुदक्षिणा देण्याची वेळ आली आहे. याचाच एक भाग म्हणून गर्लगुंजी गावातील महिला भगिनी, आजी-माजी विद्यार्थी आबाल वृद्धासह नागरिकांनी सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गावात एक भव्य रॅली काढून न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप उमेदवार विठ्ठल हलगेकर यांना 90 टक्के पाठिंबा गावातून मिळणार यात शंका नाही असे विचार यावेळी अनेकाने व्यक्त केले.
अबूतपूर्वगर्दीने गर्लगुंजी गावात एकच आवाज श्रीमान विठ्ठल हलगेकर निर्माण झाला होता. दिलेल्या सहकार्याची पोचपावती बुधवारी दि. 10 रोजी होणाऱ्या निवडणुकीत बहुमूल्य अशा मतदानाच्या स्वरूपात सरांच्या पदरात गुरुदक्षिणा द्यावी असे आवाहन माजी जिल्हा पंचायत सदस्य ज्योतिबा रेमानी यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी परशराम चौगुले, जयसिंगराव पाटील , पी.वाय. देसाई , राजू सिद्धांनी, नंदकुमार निटूरकर , सुरेश देसाई, मंजुळा कापसे, तसेच ग्रामपंचायतचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते.