Home » खानापूर : मराठीच्या हक्कासाठी लढणाऱ्या लढवय्यांचा सत्कार! मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचा उपक्रम!

खानापूर : मराठीच्या हक्कासाठी लढणाऱ्या लढवय्यांचा सत्कार! मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचा उपक्रम!

Photo_1788005737921
  • मराठीच्या हक्कासाठी लढणाऱ्या लढवय्यांचा सत्कार
  • मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने गणपती बावकर, मोहन पाटील यांचा गौरव


खानापूर : मराठी माध्यमाच्या शिक्षक पदांसाठी सातत्याने पाठपुरावा करून मराठीच्या हक्कासाठी आवाज उठविणाऱ्या डी.एड.धारक गणपती बावकर (खैरवाड) आणि मोहन पाटील (मणतुर्गा) यांचा मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करून गौरव करण्यात आला.
प्राथमिक शिक्षक भरती प्रक्रियेत मराठी माध्यमातील रिक्त जागांकडे दुर्लक्ष होत असल्याने बावकर व पाटील यांनी संघटितपणे शासनाकडे पाठपुरावा केला. संबंधित मंत्री, सचिव तसेच अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन निवेदने सादर करत मराठी माध्यमातील शिक्षकांच्या जागा भरण्याची मागणी त्यांनी लावून धरली. त्यांच्या या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून मराठी माध्यमासाठी २०० शिक्षक पदे मंजूर करण्याची शासनाकडून हमी देण्यात आली आहे.
तसेच उर्दू माध्यमासाठी ८०० शिक्षक पदे मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण विभागाकडून संबंधित खात्याकडे पाठविण्यात आला असून शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर शिक्षक भरतीची अधिसूचना जारी होण्याची अपेक्षा आहे.
या पार्श्वभूमीवर मराठीच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या दोन्ही शिक्षकांचा मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, खजिनदार ईश्वर बोबाटे, ऋतिक कुंभार, वासुदेव चौगुले, दत्ता गावडे, गजानन बेळगावकर, बाबाजी पाटील, हनुमंत सुतार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पत्रकार पिराजी कुराडे यांनी केले.


“मराठी माध्यमाच्या हक्कासाठी पाठपुरावा सुरूच राहील”


“आम्हाला ३०० ते ८०० जागांची अपेक्षा होती. तरीही सरकारने मराठी माध्यमासाठी २०० जागा मंजूर करण्याची हमी दिली आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे डी.एड. पात्र उमेदवारांनी आतापासूनच सीईटी परीक्षेची जोरदार तयारी करावी,” असे गणपती बावकर यांनी सांगितले.

तसेच या प्रयत्नासाठी तालुक्याचे आमदार, काही ज्येष्ठ शिक्षक तज्ञ, अधिवक्ते व राजकीय मंडळी तथा पत्रकारानी सहकार्य केले त्यांची कृतज्ञता व्यक्त करत असेच मराठी शिक्षणाच्या हक्कासाठी सर्वांची सहकाराची अपेक्षा व्यक्त केली.


मराठी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर होण्याबरोबरच पात्र डी.एड.धारकांना रोजगाराची संधी मिळण्याची शक्यता आहे. बावकर आणि पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे व मराठीच्या हक्कासाठी केलेल्या लढ्याचे तालुक्यातून कौतुक होत आहे.

Collapsible

file_000000001b74820799e07b483d12e9d6
विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी; चापगावात श्री दुर्गादेवी सभामंडपाचे उद्घाटन चापगाव / वार्ताहर : खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये मंदिर, सभामंडप …
file_0000000097648211a6d6adc4637fbf58
श्री दुर्गादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाची उत्साहात सांगता; ओटी भरणी, मान्यवरांचा सत्कार आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन! चापगाव / वार्ताहर :खानापूर तालुक्यातील चापगाव …
file_000000008c9c8211b80aa4fe8b0fd3e7
चापगावात आज श्री दुर्गादेवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम दुपारी महाप्रसाद, रात्री श्रीकृष्ण पारिजात नाटकाचे आयोजन चापगाव / प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील …
file_000000007238821187f5570b2982c78b
ಆವರೊಳ್ಳಿ ಮಠದಿಂದ ರಾಜಹಂಸಗಡದವರೆಗೆ ಭವ್ಯ ಪಾದಯಾತ್ರೆ! आवरोळी मठ ते राजहंसगड पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद! हजारो शिवप्रेमींचा सहभाग; अनेक स्वामीजी, आमदार विठ्ठल हलगेकर …
file_00000000f07c821189df872818cdd7b6
अनगडी येथे उद्यापासून श्री हरिनाम सप्ताहाचे आयोजन! कलमेश्वर मंदिराच्या चौथारा बांधणीसाठी जागादान करणाऱ्या मिराशी दाम्पत्याचा होणार सन्मान; आमदार विठ्ठल हलगेकर …
file_00000000656c82119b1f2e299b6634eb
ಕಾರಲಗಾ: ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಜಾತ್ರೆಯೊಳಗೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಪರಿಹಾರ ಕಲ್ಪಿಸಿ! ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा रोष; नवीन पंचायत विकास अधिकारी नियुक्त करणार – आमदार विठ्ठल …

Do Share
error: Content is protected !!
Call Us