खानापुरात १७ सप्टेंबरला विश्वकर्मा जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा
खानापुरात १७ सप्टेंबरला विश्वकर्मा जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा

खानापूर : श्री विश्वकर्मा समाज विकास संघ, खानापूर यांच्या वतीने श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही शोभायात्रा श्री चौराशी देवी मंदिर, खानापूर येथून सुरू होऊन शिवस्मारकापर्यंत काढण्यात येणार आहे. यावेळी वारकरी व भजन मंडळांच्या भजनाच्या गजरात शोभायात्रा पार पडणार असून विश्वकर्मा समाज बांधव-भगिनी तसेच इतर समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शोभायात्रेपूर्वी श्री चौराशी देवी मंदिरात विश्वकर्मा जयंतीचे पूजन करण्यात येणार आहे. परमपूज्य श्री रामदास स्वामी महाराज (मठाधीश, तोपिनकट्टी) यांच्या उपस्थितीत पूजनाचा कार्यक्रम होणार आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन व दीपप्रज्वलन
शोभायात्रेच्या उद्घाटन व दीपप्रज्वलन कार्यक्रमास खानापूरचे आमदार विठ्ठल सो. हलगेकर, कर्नाटक राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद सु. कोरेरी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय कुबल, कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चा सेक्रेटरी धनश्री सरदेसाई तसेच सदानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमास भाजप युवा मोर्चा बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष पंडित ओगले, भाजप प्रधान कार्यदर्शी खानापूर मल्लाप्पा मारिहाळ, खानापूर नगर सेवक अध्यक्ष मनिषा प्रकाश बैलूरकर, भाजप मंडळ अध्यक्ष प्रशांत पाटील, महिला भाजप तालुका अध्यक्ष सुनीता पाटील, पी.के.पी.एस. चेअरमन राज सिद्धनी आणि पी.के.पी.एस. संचालक शंकर पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
श्री विश्वकर्मा समाज विकास संघ, खानापूर यांच्या वतीने सर्व समाज बांधव-भगिनींनी या भव्य शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
