Home » चापगावचा महिमा आरती संग्रह व सुरेल गाण्यांचे युट्युब ऑडिओ लॉन्चिंग! चापगावचा महिमा आता दूरवर पोहोचेल” — माजी उपसभापती मल्लाप्पा मारीहाळ

चापगावचा महिमा आरती संग्रह व सुरेल गाण्यांचे युट्युब ऑडिओ लॉन्चिंग! चापगावचा महिमा आता दूरवर पोहोचेल” — माजी उपसभापती मल्लाप्पा मारीहाळ

file_000000006dfc82308641e306f082c5c2

चापगावचा महिमा आरती संग्रह व सुरेल गाण्यांचे युट्युब ऑडिओ लॉन्चिंग!

“चापगावचा महिमा आता दूरवर पोहोचेल” — माजी उपसभापती मल्लाप्पा मारीहाळ

चापगाव / प्रतिनिधी : प्रत्येक गावाला धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला असतो. गावातील प्राचीन देवस्थाने आणि दैवी शक्तीस्थळे ही त्या गावाच्या वैभवाची व श्रद्धेची ओळख असतात. चापगावच्या पुरातन इतिहासाचा शोध घेणारे ‘शोध चंपावती नगरीचा’ हे पुस्तक पत्रकार पिराजी एम. कुऱ्हाडे यांनी प्रकाशित करून गावचा ऐतिहासिक वारसा समाजासमोर आणला आहे. आता याच देवस्थानांची महती आरती संग्रह आणि सुरेल गाण्यांच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे.

चापगावच्या धार्मिक वैभवाची महती दूरवर पोहोचविणाऱ्या ‘चापगावचा महिमा’ आरती संग्रहाचा युट्युब ऑडिओ लॉन्चिंग सोहळा गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सोमवारी थाटात पार पडला. यावेळी बोलताना तालुका पंचायतीचे माजी उपसभापती तथा भाजपा नेते मल्लाप्पा मारीहाळ यांनी चापगावचा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा संगीताच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

येथील वक्रतुंड सार्वजनिक गणेश मंडळाच्या सभामंडपात गणेशमूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘चापगावचा महिमा’ आरती संग्रहाचे प्रकाशन तसेच युट्युब ऑडिओ लॉन्चिंग करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष भरमानी शहापूरकर होते.

यावेळी आरती रचनाकार पिराजी एम. कुऱ्हाडे म्हणाले की, चापगावचा इतिहास आणि पुरातन देवस्थानांचा लेखाजोखा मांडल्यानंतर येथील मंदिरांची महती आरतीच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने हा आरती संग्रह साकारण्यात आला आहे. आपल्या गावच्या दैवतांचे महत्त्व गावातील भक्तांनी जगासमोर मांडले, तर चापगावची धार्मिक महती देश-विदेशात पोहोचण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

युट्युबवर आरती संग्रह ऐकण्यासाठी…

युट्युबवर मराठीत “चापगावचा महिमा” किंवा इंग्रजीमध्ये “Chapagaon Gods Aarati”

असे टाईप केल्यास ‘चापगावचा महिमा’ आरती संग्रहातील सुमधुर गाणी सहज उपलब्ध होतील.

यावेळी नामदेवराव कदम, कल्लाप्पा कदम, गणेश कदम, यल्लाप्पा कदम, महादेव दळवी, अनिल बेळगावकर, संतोष कदम, भरमा पाटील, गजानन बेळगावकर, प्रकाश कदम यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी सार्वजनिक गणेश मंडळाच्या ज्ञानेश्वर सभामंडपाचे लोकार्पण तसेच मंडळासाठी नव्याने आणण्यात आलेल्या डॉल्बी साऊंड सिस्टीमचे अनावरण उद्योजक नामदेवराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान, फोंडेश्वर गल्ली, पाटील गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक प्रवेशद्वार आणि लक्ष्मी गल्ली येथेही सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी ‘चापगावचा महिमा’ आरती संग्रहाचे लोकार्पण करण्यात आले.

फोंडेश्वर गल्ली येथे मष्णू बेळगावकर, शंकर बेळगावकर, लक्ष्मण बिर्जे, हनुमंत गुरव, हनुमंत धबाले, मारुती चोपडे, संजय बेळगावकर, शिवाजी बिर्जे, परशराम अंबाजी, तानाजी बिर्जे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

पाटील गल्ली येथे ह.भ.प. परसराम पाटील, विनाजी पाटील, पांडुरंग पाटील, सुनील पाटील, शाहू पाटील, विष्णू पाटील, तुकाराम पाटील, महेश पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज चौक प्रवेशद्वार येथे निवृत्त मुख्याध्यापक पी. आर. पाटील (गोवा), हॉटेल व्यावसायिक अर्जुन पाटील, हाडाचे वैद्य रोशन पाटील, बळीराम धबाले, संतोष धबाले, गणपती कुऱ्हाडे, परसराम निलजकर, आकाश धबाले, ओमकार कुऱ्हाडे, सुधन कदम, हरी यळगुकर, फोडू धबाले यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

लक्ष्मी गल्ली येथे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नागराज यळूरकर, मंडळाचे अध्यक्ष संतोष मारीहाळ, केशव घारशी, रुद्रापा अंगडी तसेच मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत आरती संग्रहाचे लोकार्पण करण्यात आले.

‘चापगावचा महिमा’ आरती संग्रहामुळे चापगावच्या धार्मिक परंपरा, देवस्थाने आणि सांस्कृतिक वैभवाला संगीताची नवी जोड मिळाली असून, हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा सुंदर प्रयत्न ठरला आहे.

सार्वजनिक गणेश मंडळासमोर लोकार्पण…photos

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us