गर्लगुंजी : मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटून घरी परतत असताना दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने अपघातात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना येळूर- सुळगा नजीक गुरुवारी सायंकाळी घडली आहे..
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गर्लगुंजी येथील येथील अरुण मष्णू पाटील (वय 63) आपल्या द्वितीय मुलीच्या लग्नाचे निमंत्रण पत्रिका घेऊन बेळगाव भागात पै पाहुण्यांना भेटायला गेले होते. येत्या एक 1 जून रोजी मुलीचा विवाह सोहळा असल्याने त्यांची लग्न निमंत्रण पत्रिका वाटपात घाई होती. येळूर भागात निमंत्रण पत्रिका वाटून ते संध्याकाळी 7.30 च्या दरम्यान ते सुळगा मार्गे गर्लगुंजीकडे निघाले असता सुळगा गावाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली, असता त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. अरुण पाटील हे सात ते आठ वर्षे भारतीय सेनेत काम करून स्वेच्छा निवृत्ती घेऊन गावात व्यवसाय करत होते. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे.