खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे निरंजन सरदेसाई यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून निवडणुकीच्या माध्यमातून समितीला पुन्हा नव्याने बळ मिळणार आहे. रविवारी खानापूर येथील शिवस्मारकात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आलेल्या दोन जणांच्या अर्जावर चर्चा करण्यात आली. समितीकडे निरंजन सरदेसाई व रणजीत पाटील यांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये निरंजन सरदेसाई यांना रणजीत पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर छत्रपती शिवरायांना अभिवादन करून युवा नेते व समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांना कारवार मधून लोकसभेसाठी समितीचा उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला व तशी घोषणा करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यातून होत होती. त्यानुसार दोन्ही ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रविवारी खानापुर येथील शिवस्मारक येथे तालुका समितीची अध्यक्षस्थानी गोपाळराव देसाई होते. यावेळी उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच लोकसभेच्या माध्यमातून मराठी भाषिकांची ताकद दाखवून देण्याचा निर्धार करण्यात आला.
प्रारंभी सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी प्रास्तविक केले. लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या रणजीत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत निरंजन सरदेसाई यांना जाहिर पाठींबा व्यक्त केला.
माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, गोपाळ पाटील, रमेश धबाले, रामचंद्र गावकर, संजीव पाटील, मारुती परमेकर, बाळासाहेब शेलार, वसंत नवलकर, मारुती गुरव, म्हात्रू धबाळे, सुनील पाटील, भीमा करंबळकर, ब्रह्मानंद पाटील, कृष्णा मन्नोळकर, मुकुंद पाटील, अजित पाटील, रणजित पाटील, भास्कर पाटील, कृष्णा धुळ्याचे, नागेश परवाडकर, बाळू बिर्जे, शिवाजी देसुरकर, रामचंद्र पाटील, कृष्णा धुळ्याचे, कृष्णा राणे, अॅड. अरुण सरदेसाई, तुकाराम देसाई, अमृत शेलार, राघोबा चापगावकर, अभिजित सरदेसाई, नागेश भोसले, सुधीर नवलकर, पुंडलिक पाटील, कृष्णा पाटील, श्री पाटील, सदानंद पाटील, हेब्बाळकर गुरुजी तिवोली यांच्यासह समिती कार्यकर्ते उपस्थित होते.
शेअर करा