खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
- खानापूर तालुक्यातील कुसमळी नजीकच्या ब्रिज साठी निधीची तरतूद करण्यात आली असून पावसाळ्यानंतर गोवा सरहदीपर्यंतचा चोरला रस्ता तसेच कुसमळी ब्रिज कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. सदर ब्रिजच्या कामाचे निविदा मागवण्यात आली आहे. शिवाय हेमडगा मार्गावरील हालात्री वरील पुलाच्या मंजुरीचा प्रस्तावही शासन दरबारी प्रलंबित असून याचेही लवकरच काम हाती घेतले जाईल असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकी होळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आज शुक्रवारी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी त्यांचा खानापूर तालुका दौरा झाला या दौऱ्यात विविध रस्त्यांची पडझड झालेल्या घरांची पाहणी केली तसेच तालुक्यातील विविध समस्या संदर्भात आलेल्या निवेदनांचा विचार करून त्या सोडवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर , माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर, यासह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी सह सर्व विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.
आमगाव गावच्या स्थलांतर प्रश्न! पावसाळ्यानंतर जिल्हाधिकारी भेट देणार!
- पालकमंत्र्यांच्या आजच्या दौऱ्यामध्ये प्रामुख्याने आमगाव गावच्या स्थलांतराच्या प्रश्न उपस्थित करण्यात आला. खामगाव गावातील अनेक नागरिक निवेदनासह आम्हाला विकास करून द्या नाहीतर स्थलांतरित करा अशा पद्धतीची मागणी करत सरसावले होते. या त्यांच्या मागणीची दखल घेता तसेच आमगावच्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा लक्षात घेता या गावाच्या स्थलांतराचा प्रश्न गांभीर्याने घेतला जाईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना लवकरच आमगाव पर्यंत जाऊन तेथील जनतेचे मनोगती घेऊन शासन दरबारी प्रस्ताव पाठवण्यात येईल असे यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले. दरम्यान या संदर्भात स्थानिक आमदार, विधान परिषद सदस्य आपण चर्चा केली आहे. आमगाव वाशियांचा स्थलांतराचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे, पण यासाठी आवश्यक कायदेशीर तरतुदी तथा तेथील जनतेची इच्छाशक्ती, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास घेऊन तसा प्रस्ताव राज्य सरकार कॅबिनेट पर्यंत गेला पाहिजे त्यानंतरच स्थलांतराचा प्रश्न व त्यांना पर्यायी योजना देऊन समस्या सोडवण्यास येतात यासाठी क्रम घेण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
कॉलिटी पोल्ट्री प्रकरण ; जनतेच्या जीवाशी खेळू नका…! सोमवारी जिल्हाधिकारी कौलापूरवाड्यावर!
- यावेळी कौलापूरवाडा येथील शेकडो नागरिक पालकमंत्र्यांना भेटून आपल्याला कॉलिटी पोल्ट्री प्रकरणापासून मुक्त करा, अन्यथा आम्हालाही स्थलांतरित करा अशा आशयाचे निवेदन घेऊन पालकमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तसेच डॉ. अंजली निंबाळकर यांनी यासंदर्भात येथील स्थानिकांना होणारे त्रास व आरोग्यावर होणारे परिणाम यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांनी कौलापूरवाडा गावाला भेट देऊन तेथील जनतेच्या समस्या व परिस्थितीची पाहणी करावी व नागरिकांना न्याय देण्यासंदर्भात पावल उचलावीत असे ठोसपणे सुचित केले. त्यामुळे स्वतःजिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सोमवारी कौलापूरवाडा गावाला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले.
14 गावांच्या स्थलांतराचा प्रश्न तूर्तास नाही!
- खानापूर तालुक्यातील जवळपास 14 गावे स्थलांतराच्या प्रतीक्षेत आहेत भीमगड अभयारण्यामध्ये येणाऱ्या 14 हे गावांना सुविधांचा अभाव असल्यामुळे येथील नागरिक स्थलांतराच्या तयारीत असा प्रस्ताव विधान परिषदेमध्ये उपस्थित झाला. यानुसार आज पालकमंत्री सतीश जार्कीहोळी यांना पत्रकारांनी विचारले असता 14 गावांच्या स्थलांतराचा प्रश्न अद्याप कॅबिनेटमध्ये चर्चेत आला तसा प्रस्ताव घेण्याचे असल्यास कायदेशीर बाबीचा आधार घेत राज व केंद्र सरकारच्या निर्णयानंतरच तो निर्णय घेणे शक्य असतो. यामुळे तूर्तास हा स्थलांतराचा प्रश्न हाती घेणे शक्य नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.