चापगाव/ प्रतिनिधी : खानापूर तालुक्यात अनेक पुरातन मंदिरे विकासापासून मागे आहेत. मंदिरांच्या विकासासाठी भारतीय पुरातत्त्व खात्याच्या योजना राबवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. तालुक्यात अनेक मंदिरे धर्मादाय खात्याकडे नोंद नाहीत. अशा मंदिरांना नोंद करून घेणे गरजेचे अत्यावश्यक आहे. आज चापगाव सारख्या ठिकाणी अनेक मंदिरे पुरातन आहेत.पण जिर्णोद्वारासाठी आवश्यक निधी नसल्यामुळे अडचणीत आहेत. त्या नजीकच्या काळात पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करणार असून खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा राबवण्यात येत आहे. नजीकच्या काळात सर्वांना विश्वासात घेऊन ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत,त्या पूर्ण करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत नवनिर्वाचित आमदार विठ्ठल हलगेकर यांनी चापगाव येथे श्री 1008 आदिनाथ जैन मंदिरात अमावस्येच्या निमित्ताने आयोजित महापूजा कार्यक्रमात सत्कारमूर्ती या नात्याने बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद कोचेरी होते. व्यासपीठावर जेष्ठ संचालक डी. डी. पाटील, चापगाव ग्रामपंचायत चे माजी अध्यक्ष रमेश धबाले, पत्रकार पिराजी कुऱ्हाडे,माजी उपसभापती मल्लाप्पा मारीहाळ, महाबळेश्वर घार्शी, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय कांची, प्रभाकर मुतगी, उदय पाटील,रुद्राप्पा अंगडी महादेव दळवी, जैन युवा समितीचे कार्यकर्ते राजू पाटील, चेतन भेंडीगिरी, राजू कंची, पारीस हाणब्रेट्टी गुंडू कडबी आदी उपस्थित होते यावेळी श्री 1008 आदिनाथ मंदिर ट्रस्ट युवा समितीच्या वतीने आमदार विठ्ठल हलगेकर यांचा श्रीफळ शाल देऊन सत्कार करण्यात आला.
चापगाव युवा कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार
श्री 1008 आदिनाथ मंदिराला पुरातन इतिहास