Oplus_16777216
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
खानापूर – पारिशवाड रस्त्यावरील भला मोठा पडलेला तो खड्डा पुन्हा एकदा चर्चेत झाला. दोन दिवसांपूर्वी या खड्ड्यात वाहने अडकून अपघाताला निमंत्रण झाल्याची बाब आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या निदर्शनाला आणून देताच त्यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना तातडीने खड्डा बुजवण्याची सूचना केली होती. पण तोवर भाजपच्याच काही तसेच गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी माती टाकून तो पडलेला खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला. पण त्या खड्ड्या बुजवण्याच्या नादात त्या ठिकाणी चिखलच चिखल झाला. त्यामुळे या रस्त्यावरची आणखीनच कठीण बिकट परिस्थिती झाली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी या खड्डा मुजविण्यासाठी काम हाती घेण्यापूर्वीच भाजपमधील काही कार्यकर्त्यांनी तो खड्डा बुजवण्याचे श्रेय घेतले. खड्डा बुजवण्यासाठी श्रेय लाटण्याचा प्रयत्न झाला खरा ,पण चिखलमय मुरूम टाकल्याने त्या ठिकाणी खड्डा बरा,पण चिखल नको! अशी त्रासदायक परिस्थिती निर्माण झाली. शेवटी आज गुरुवारी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बेंगलोर येथे असतानाही संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना करून तातडीने तो चिखल माती हटवून त्या ठिकाणी काळी खडी टाकून रस्ता करण्याची सत्ता सूचना केली. एकीकडे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी भाजपच्याच काही कार्यकर्त्यांनी घरचा आहेर देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पुन्हा चिखल झाल्याने याची तातडीने दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याला या ठिकाणी पडलेला खड्डा मुजवून पडलेला चिखल हटवण्यासाठी व त्या ठिकाणी भक्कम स्वरूपाची खडी टाकण्यात आली आहे. एकंदरीत रस्त्यावर पडलेले खड्डे हे पावसामुळे दयनिय झाले आहेत. हे खरे असले तरी पावसाळ्यात भक्कम रस्ता करणे अवघड आहे. पारिशवाड क्रॉस जवळ मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा हा यापूर्वीही सार्वजनिक बांधकाम खात्याने बुजवला होता. पण या रस्त्यावरील वाहतुकीचा अधिक असल्याने ठिकाणी कितीही माती टाकली किंवा खडी टाकली तरी तो रस्ता भक्कम होणे कठीण आहे. सध्या परिस्थितीत आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंते संजय गास्ती यांनी या पडलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी स्वतः उभे राहून भक्कम स्वरूपाची खडी टाकली आहे. त्यामुळे सध्या परिस्थितीत येथील समस्या दूर झाली आहे. इकडे रूमेवाडी क्रॉस जवळ पडलेले खड्डे सपाटीकरण करण्यात आले आहेत. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या ठिकाणचे खड्डे मुजवण्यासाठी Whether केले आहेत. मात्र या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे भक्कम काम सध्यपरिस्थितीत हाती घेणे शक्य नाही. या ठिकाणी 14 कोटी रुपयांच्या निधीतून हा संपूर्ण रस्ता पूर्णत्वाला येणार आहे. त्यामुळे पावसाळा संपतोपर्यंत वेट अँड वॉच करावे लागणार आहे.
आमदार म्हणतात…

खानापूर तालुक्यातील अनेक रस्त्यावर खड्डेमय चिखल झाला आहे. रस्त्यांच्या पूजाही हाती घेतले आहेत. पण पावसाळा सुरू झाल्याने कामे सुरू होणे शक्य झाले नाही. त्यामुळे नाईलाज आहे. रुमेवाडी क्रॉस नजीकच्या रस्त्यासाठी 14 कोटीचा निधी मंजूर आहे पण पावसाळा सुरू झाल्याने काम थबकले आहे. या ठिकाणी पडलेले खड्डे मूजण्यासाठी दोन-तीन वेळा प्रयत्न केले.पण भक्कम रस्ता झाल्याशिवाय या ठिकाणची परिस्थिती सुधारत नाही.करिता प्रवाशांनी थोडी सबुरी घ्यावी, लवकरच हा रस्ता पूर्ण होईल. खानापूर ते पारिशवाढ या या मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा आम्हाला ज्ञात आहे. या ठिकाणी भक्कम स्वरूपाची खडी टाकून अडचण दूर करण्याची सूचना दोन दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना आपण केली होती. संबंधित विभागाचे अधिकारी गुरुवारी सायंकाळी त्या ठिकाणी खडी टाकून काम करणार होते. पण तत्पूर्वी भाजपमधीलच आपल्या काही संघमित्रांनी श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात माती टाकून त्या ठिकाणी चिखलच केला. तो चिखल हटवून आज गुरुवारी त्या ठिकाणी खडी ट**** अनिवार्य ठरले. पावसाळा म्हटलं तर अशा काही खड्डेमय घटना घडणारच. खानापूर तालुक्याला काही नवीन नाही, पण यासाठी थोडी सबुरी ही घेणे गरजेचे ठरते.
बैलूर रस्त्याचा प्रश्न :
बैलूर ते चोरला हायवे मार्गाला जोडणारा चार किलोमीटरचा रस्ता भक्कम करण्यासाठी यापूर्वी आपण त्याचे पूजनही केले आहे. सदर रस्ता पावसाळ्यापूर्वी करण्यासाठी एका कंत्राटदाराला ऍडव्हान्स सूचना केली होती. त्यामुळे त्या कंत्राटदराने काम करण्याची तयारी केली होती, पण त्या रस्त्याच्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू असताना आणखी एका कंत्राटदाराने त्या ठिकाणी टेंडर टाकल्याने काम करणाऱ्या कंत्राटदराला अडचण आली. आता त्या अडचण केलेल्या कंत्राटदराने आपले टेंडर मागे घेतल्याने पूजा करून दिलेल्या कंत्राटदराला आता काम करण्यासाठी वाट मोकळी झाली आहे. त्यामुळे पावसाळा कमी होताच बैलूर रस्त्याच्या कामाला नक्की प्रारंभ होणार असल्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी ‘ खानापूर लाईव्ह’ शी बोलताना सांगितले.