खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी: गोव्याहून बेळगाव कडे येणाऱ्या कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसला गुंजी जवळ अचानकपणे समोरून एक टिप्पर आडवा आल्याने त्यांना चुकवण्याच्या नादात बस रस्त्याकडेला जाऊन गटारी कलंडली. पण सुदैवाने या अपघातात कोणाही प्रवाशाला धोका पोहोचला नाही. केवळ चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळल्याची घटना रविवारी दुपारच्या दरम्यान घडली आहे.
त्याबाबत मिळालेली माहिती की गोळ्याहून खानापूर कडे येणारी कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस येत असताना कलमेश्वर मध्ये मंदिर अचानक एक टिप्पर समोरून आला, धडक होईल या भीतीने बस चालकाने रस्त्याकडेला बस घेतली. मात्र रस्त्याकडेला मोठ्या चरित बस पलटी होता होता थांबली. व मोठा अनर्थ टळला.घटनास्थळी गावातील काही नागरिकानी तातडीने दाखल झाले व बसमधील प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले केवळ चालकाच्या प्रसंगावधानामुळे या ठिकाणी मोठा अपघात ठरला आहे