• bangalor: कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये दिवसाढवळ्या मोठी चोरी झाल्याची घटना घडली आहे. येथे पार्क केलेल्या बीएमडब्ल्यू कारमधून सुमारे 14 लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना घडली.
  • ही चोरीची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
  • मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन तरुण दुचाकीवर आले आणि कारजवळ दुचाकी थांबवल्याचे दिसत आहे. यानंतर एका तरुणाने कारची काच फोडून आत प्रवेश केला आणि पैशांची बॅग घेऊन पळ काढला.एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, सीसीटीव्ही फूटजमध्ये दिसत आहे की, BMW X5 कारजवळ दोन जण तोंडावर रुमाल बांधून आल्याचं दिसत आहे. या कारची किंमत एक कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांपैकी एक बाईकवर आहे आणि दुसरा अवतीभवती पाहत असल्याचं दिसत आहे. यानंतर यातील दुसरा व्यक्ती कारची काच फोडतो आणि त्या आत शिरीतो.
  • याचदरम्यान, त्याचा साथीदार बाईक सुरु ठेवून त्याची वाट पाहताना दिसतो. यानंतर हातात एक पॅकेट घेऊन तो माणूस लवकरच बाहेर येतो. तो दुचाकीवर बसतो आणि दोघेही घटनास्थळावरून पळून जातात. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us