- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: उत्तर कन्नड लोकसभा मतदार क्षेत्रातील काँग्रेसच्या उमेदवार व खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचा उद्या बुधवार दि. 17 रोजी खानापूर तालुक्यातील काही प्रमुख ग्रामपंचायतना दौरा होणार आहे. सकाळी 8 वाजता पहिली भेट निटूर ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांच्या साठी राहणार आहे. या ठिकाणी कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर इदलहोंड या ठिकाणी सकाळी 9.30 वाजता, सकाळी 10:30 वाजता हलकर्णी या ठिकाणी, सायंकाळी 6 वाजता गर्लगुंजी, रात्री 8 वाजता तोपिनकट्टी तर रात्री 9 वाजता बरगाव या ठिकाणी कोपरा सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्ते व मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांनी मत याचना करणार आहेत. तरी संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी तसेच मतदाराने व पक्ष कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन ब्लॉक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
- डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कारवार या ठिकाणी दिवसभर झालेल्या व त्या भागातल्या कार्यकर्त्यांच्या गाठी गाठी व जिल्हा पंचायत निहाय सभांचे आयोजन करून जोरात प्रचार सुरू ठेवला आहे. उत्तर कन्नड विभागातील भटकळ असून हल्ल्यापर्यंतच्या सर्व भागात त्यांना भरघोस पाठिंबा मिळत आहे आता स्वतःच्या हक्काच्या खानापूर तालुक्यात मतांचा उच्चांक साधण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने डॉ. अंजलीताई निंबाळकर खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटीगाठी घेत आहेत. खानापूर तालुक्यातूनही त्यांना भरघोस पाठिंबा व्यक्त केला जात आहे.
- ಖಾನಾಪುರ ನೇರ ಸುದ್ದಿ / ಪ್ರತಿನಿಧಿ: ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಹಾಗೂ ಖಾನಾಪುರದ ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಡಾ. ಅಂಜಲಿತಾಯಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ನಾಳೆ ಬುಧವಾರ. 17ರಂದು ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಕೆಲವು ಪ್ರಮುಖ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಗಳ ಪ್ರವಾಸ ನಡೆಯಲಿದೆ. ಬೆಳಗ್ಗೆ 8 ಗಂಟೆಗೆ ಮೊದಲ ಸಭೆ ನೀಟೂರು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ನಾಗರಿಕರಿಗಾಗಿ ನಡೆಯಲಿದೆ. ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕಾರ್ನರ್ ಮೀಟಿಂಗ್ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಬಳಿಕ ಇಡಲಹೊಂಡದಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆ 9.30ಕ್ಕೆ, ಹಲಕರ್ಣಿಯಲ್ಲಿ 10:30ಕ್ಕೆ, ಗರ್ಲ್ಗುಂಜಿಯಲ್ಲಿ ಸಂಜೆ 6ಕ್ಕೆ, ಟೋಪಿನಕಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ರಾತ್ರಿ 8ಕ್ಕೆ, ಬಾರ್ಗಾಂವದಲ್ಲಿ 9ಕ್ಕೆ ಕೊಪ್ಪರ ಸಭೆಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಪ್ರಮುಖ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹಾಗೂ ಮತದಾರರನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡಿ ಮತ ಯಾಚನೆ ಮಾಡಲಿದ್ದಾರೆ. ಆದರೂ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ನಾಗರಿಕರು ಹಾಗೂ ಮತದಾರರು ಹಾಗೂ ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಆಗಮಿಸುವಂತೆ ಬ್ಲಾಕ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮನವಿ ಮಾಡಿದೆ
- .