IMG-20230518-WA0119


जांबोटी: खानापूर- आमटे मार्गावर धावणाऱ्या बसचा ब्रेक निकामी झाल्याने आमटे नजीक बसला अपघात झाल्याची घटना (दीं. 18रोजी) साडेपाचच्या सुमारास घडली आहे. चालकाने प्रसंगावधान साधून रस्त्याकडेला असलेल्या एका काजूच्या बागेत बस घालून बस पलटी होता होता सावरल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

याबाबत मिळालेली माहिती की खानापूर बस आगारातून जाणारी खानापूर आमटे ही बस आमटे गावाकडे जात असताना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कालमनी नजीक बसचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे बस वरील नियंत्रण तुटले. समोरून येणाऱ्या वाहणाना चुकवण्यासाठी चालकाने बाजूला असलेल्या काजू बागेमध्ये घातली. व बसवर नियंत्रण आणले. या बस मध्ये जवळपास 25 ते 30 प्रवासी होते. सुदैवाने बस पलटी झाली नाही.

मात्र झालेल्या धक्काबुक्कीत सर्व प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून मोठा धोका टाळला आहे. तातडीने बसला झालेल्या अपघातामुळे परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी करून बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले तातडीने 108 आरोग्यवाहिकेला पाचारण करून बसमधील जखमी प्रवाशांना खानापूर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us