Screenshot_20240502_105430
  • खानापूर: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे सध्या उन्हाळ्याचा क** हंगाम असताना निवडणूक प्रचार तथा सभांच्या कार्यक्रमासाठी मनरेगाचे कर्मचारी टारगेट केले जात आहेत. मनरेगाच्या कर्मचाऱ्यांना हजेरीवर लावून सभा कार्यक्रमांना वेटीस धरण्याचा प्रकार घडत असून अशा विरोधात आपण जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांच्याकडे लेखी तक्रार करून ग्रामपंचायत विकास अधिकारी तसेच तालुका पंचायत च्या अधिकाऱ्यांच्या वर कारवाई करण्याची मागणी केली जाणार असल्याचे तालुका ब्लॉस काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
  • ते म्हणाले, सध्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदार आपल्या पद्धतीने आपला उमेदवार निवडीसाठी सज्ज झाले. शासनाच्या योजना तसेच केलेली कामे ही रोजंदारी करणाऱ्या मजुरांना माहित आहे. त्यामुळे रोजंदारीवर राबणारे कर्मचारी अथवा मतदार योग्य उमेदवाराला मतदान करून निवडून देतील यात शंका नाही. परंतु राजकीय स्वार्थासाठी काही पक्षीय लोक मनरेगाच्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर करून सभांना बोलावून त्याचा गैरफायदा उचलत आहेत. न आलेल्या कर्मचाऱ्यांना धमकी दिली जात असल्याचे निदर्शनाला आले आहे. याला तालुक्यातील काही पीडीओ तसेच तालुका पंचायत अधिकारीही समर्थन करत असल्याचे आमच्या निदर्शनाला आले आहे. अशा अधिकाऱ्यांच्या कारवाई करण्याची मागणी जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांच्याकडे ब्लॉक काँग्रेस पक्षाच्या वतीने करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us