IMG_20230525_114202

खानापूर: प्रतिनिधी; खरीप हंगाम आता उंबरठ्यावर पोहोचला आहे. आगामी 15 दिवसात मान्सूनला सुरुवात होणार असल्याने आता शेतकऱ्यांची पेरणी हंगामासाठी लगबग सुरू असून कृषी खात्याने ही दरवर्षी प्रमाणे भात बी-बियाणांची सवलतीच्या दरात वितरण अभियान सुरू केले आहे. गुरूवारी खानापुर येथील रयत संपर्क केंद्रामध्ये आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते भात बियाण्याच्या पोत्याचे पूजन करून अभियानाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी बोलताना आमदार आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक शेती पद्धतीकडे कल देणे गरजेचे दिवसेंदिवस पाण्याचा साठा कमी होत असल्याने कमी पाण्यात अधिक उत्पादन कसे घेता येईल यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत. प्रामुख्याने खरीप हंगामात सुधारित बियाणे अवगत करावीत पारंपारिक बी बियाणामध्ये तन व बदल भात बियाणे तयार होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा पिकातील तन किंवा बदल भात निचरा करण्यास आर्थिक मृदंड बसतो यासाठी सुधारित बियाण्यांचा वापर करणे काळाची गरज आहे. तालुक्यात 30 हजार हेक्टर मध्ये भात पेरणी केली जाते. बरेच शेतकरी हंगामानुसार पेरणी करतात तसेच बरेच लोक रोप लागवडीसाठी ही प्राधान्य देतात. त राज्य सरकार मार्फत दरवर्षी सवलतीच्या दरामध्ये बियाणांचे वाटप केले जाते. तालुक्यातील अनेक शेतकरी दरवर्षी या सुधारित बियाण्यांचा वापर करत आहेत. यानुसार यावर्षीही बियाणांचे वाटप हाती घेण्यात आली असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. शिवाय ऊस पिकावर पडणारे विशिष्ट रोग यावर नियंत्रण आणण्यासाठी कृषी खात्याकडे औषधे उपलब्ध आहेत याचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी बोलताना कृषी सहाय्यक चव्हाण म्हणाले तालुक्यात चारही रयत संपर्क केंद्रांमधून भात बियाणांचे वितरण अभियान सुरू करण्यात आले आहे. कृषी खात्याच्या खानापुर, बिडी, जांबोटी तसेच गुंजी रयत संपर्क केंद्रामध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे देऊन या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. पहिल्या टप्प्यामध्ये विविध जातीच्या 602  क्विंटल बियाणां साठा करण्यात आला असून कृषी खात्याच्या खानापुर बिडी जांबोटी तसेच गुंजी रयत संपर्क केंद्रामध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. सदर भात बियाणे प्रति 25 किलो  वजनाची असून सवलतीच्या दरात सामान्य शेतकऱ्यांना जया भात सवलतीच्या दरात 25  किलो पोते रु 681, बीपीटी रु 812, आय आर 64-  रु 707 अभिलाषा रु 831 इंठाण 831 या दरात उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी याचा  लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी आमदार हलगेकर यांनी अधिकाऱ्यांनी काम चुकारपणा न करता शेतकऱ्यांना कामात पारदर्शकता राखत सेवा द्यावी शेतकऱ्यांचे नाहक हेलपाटे होऊ नये याची खबरदारी घ्यावी सरकारी योजना नीटनेटकेपणाने व योजना बदलाव्यात अशा सूचनाही यावेळी आमदार हलगेकर यांनी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी,राजेंद्र रायका, विनायक मुतगेकर, बेळगाव ग्रामीणचे धनंजय पाटील यासह अनेक जण उपस्थित होते. शिवाय खानापूर कृषी खात्याचे अधिकारी रयत संपर्क केंद्राचे अधिकारी व शेतकरी वर्ग उपस्थित होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us