
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील ज्येष्ठ वकील तालुका ब्लॉक काँग्रेसचे माजी अध्यक्ष वकील संघटनेचे अध्यक्ष तथा घाडी फाऊंडेशनचे संस्थापक अधिवक्ते ईश्वर घाडी यांचा गुरुवारी 58 वा वाढदिवस झाला. या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक संघटनांच्या वतीने तसेच तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी त्यांचा श्रीफळ शाल देऊन गौरव करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
अधिवक्ते ईश्वर घाडी यांनी उद्या आयुष्यात माणसे जमवण्याचे काम केले आहे वकिली व्यवसायात पक्षकरांना न्याय देण्याबरोबर मित्रपरिवार जोपासला आहे त्यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करत अध्यक्ष पदाची धुरा सांभाळून पक्षाला उच्च स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला आहे आजही त्यांनी या पक्षात स्वतःला झोपून काम करून संघटना वाढीसाठी प्रयत्न करत असतात गाडी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे त्यामुळे त्यांची एक वेगळीच छाप समाजात असल्याने त्यांनी आज समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने गाडी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहेत त्यामुळे त्यांचा गौरव होणे अगत्याचे असल्याचे विचार यावेळी उभयत्यांनी व्यक्त केले.
विनायक मुतगेकर यांच्या यांचा सन्मान! दोनच दिवसांपूर्वी खानापूर तालुक्यात बाजार पावसामुळे हालात्री नाल्यावर आलेल्या पुरात वाहून जाणाऱ्या बेळगाव येथील युवकाला वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्न बद्दल खानापूर तालुका ग्रामपंचायत युनियनचे अध्यक्ष व नीलावडे ग्रामपंचायतचे माजी उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यांचाही यावेळी सन्मान करण्यात खानापूर घाडी फाउंडेशन यांच्यावतीने यावेळी सन्मान करण्यात आला.
विनायक मुतगेकर यांनी हलात्रि नाल्यात झाडावर लटकलेल्या त्या युवकाला वाचवण्यासाठी धाडस केले. हे कौतुकास्पद आहे तालुक्यात समाजाच्या हितासाठी व समस्या निवारण्यासाठी जनतेच्या दारापर्यंत धावून काम करणारे एक युव नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते अशातच युवकाला वाचवण्यासाठी त्यांनी टाकलेले पाऊलही अभिनंदन असल्याने अशांचा सन्मान होणे अत्यंत सन्मानपूर्वक असल्याचे विचार यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य महादेव घाडी यांनी व्यक्त केले.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश जाधव, आमटे कृषीपतींचे अध्यक्ष लक्ष्मण कसारलेकर, तरुण भारत चे प्रतिनिधी विवेक गिरी, विजय कर्नाटकचे प्रतिनिधी प्रसन्ना कुलकर्णी, पुढारीचे प्रतिनिधी वासुदेव चौगुले, क्षत्रिय मराठा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार, गर्लगुंजी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील, निवृत्त शिक्षक सिताराम बेडरे, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश पाटील, सुनील पाटील, नारायण पाटील, नागेश आधी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व आभार पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यानी मांडले