
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक जोड रस्ते सर्वसामान्य नागरिकांना लाभाचे आहेत मात्र गेल्या अनेक वर्षापासून अशा जोड रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कधीही विकास निधी मंजूर झाला नाही त्यामुळे ग्रामीण भागातील शेताला जोडणारे व दोन गावाला दुवा असणारे रस्ते दुरुस्ती करण्याचे काम आम्ही प्राथमिक टप्प्यासाठी घेतले आहे खानापूर तालुक्यातील अंकले – इदलहोंड दरम्यान शेतवडीतून जाणारा हा रस्ता प्रवासी वर्गाला फायदेशीर आहे. असे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शुक्रवारी विविध रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी खानापूर लाईव्ह शी बोलताना सांगितले.
याप्रसंगी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष चांगापा बाचोळकर, उदय पाटील ग्रामपंचायतचे पीडीओ देसाई तसेच ग्रामपंचायतचे सदस्य गावातील नागरिक भाजपा सेक्रेटरी मल्लापा मारीहाळ, श्रीकांत इटगी यासह अनेक जण उपस्थित होते.
हेम्मडगा रस्त्यावरील रूमेवाडी संपर्क रस्ता विकास

त्याचप्रमाणे हेम्मडगा रस्त्यावरील रूमेवाडी संपर्क रस्ता विकास कामाचा शुभारंभ आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्यासाठी 40 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या कामाच्या शुभारंभ भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप युवा नेते किशोर हेबाळकर, ग्रामपंचायत सदस्स्य महेश घाडी, बबन अल्लोळकर, प्रधान कार्यदर्शी मल्लाप्पा मारिहाळ , माजी अध्यक्ष संजय कुबल, नगरसेवक अपय्या कोडोली, प्रधान कार्यदर्शी गुंडू तोपिनकट्टी, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती ईरगार, विलास बेडरे अनेकजण उपस्थित होते.
या रस्त्यासाठी सहा कोटी पंधरा लाखाचा निधी!

तालुक्यातील विविध जोड रस्त्यांच्या विकास कामांचा शुभारंभ शुक्रवारी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आला अल्पसंख्यांक निधी तसेच 50 – 54 योजनेअंतर्गत 6 कोटी 15 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये खानापूर शहरातील अल्पसंख्यांक वसाहती मधील रस्ते व इतर कामांचा करिता 3 कोटीचे अनुदान मंजूर झाला आहे
50 – 54 योजनेअंतर्गत ग्रामीण रस्त्याचे विकासासाठी रूमेवाडी गावच्या लिंक रोड साठी 40 लाखाचा निधी मंजूर झाला आहे.

इदलहोंड- माळ अंकले लिंक रोड , गर्लगुंजी ते नंदीहळी (खानापूर तालुका हद्दीतील रस्त्याचे) डांबरीकरणसाठी 70 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्याचप्रमाणे बरगाव ते गर्लगुजी – तोपीनकट्टी रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी 1 कोटी 30 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या सर्व कामांचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला.