IMG_20250503_113221

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:

चोर्ला नजीक शनिवारी पहाटेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून गोव्याला जात असताना समोरून येणाऱ्या एका अशोक लेलँड मालवाहू रिक्षा ची जोरात धडक बसल्याने एक युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव विक्रम कोळेकर (वय 28 रा. कणकुंबी) असे आहे. विक्रम कोळेकर हा युवक गोवा येथे एका बँकेत कामाला होता असे समजते दोन दिवस शिवजयंतीच्या निमित्ताने तो गावाकडे रजेवर आला होता. आपल्या घरातील सर्व कामे आटोपून तो आज सकाळी सातच्या सुमारास दुचाकी वरून गोव्याला जात असताना चोरला नजीक हा अपघात घडला आहे. या घटनेचा पंचनामा खानापूर पोलिसात झाला आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us