खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
जंगलाची वाट धोक्याची हे नित्याचेच असल्याचा अनुभव खानापूर तालुक्याच्या जंगलपट्ट्यात काही नवीन नाही. पण या घनदाट जंगलाच्या सानिध्यातून जाताना कधी स्वापद प्राणी माणसावर हल्ला करतील हे सांगता येत नाही. अशाच प्रकारे मांजर पै येथील एक निवृत्त सैनिक आपल्या शेतवडीकडे जात असताना झुडपात असलेल्या तीन अस्वलांनी अचानक हल्ला केला. प्रसंगावधान साधून त्या माजी सैनिकाने त्यांना दगडफेक करून उसकावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान काही शेतकऱ्यांनी आरडाओरडा करून त्यांना उसकावून लावले. पण तीनही अस्वलाने एकाच वेळी हला चढवल्याने यामध्ये सदर निवृत्त सैनिक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. श्री प्रभाकर डिगेकर असे त्या निवृत्त सैनिकाचे नाव आहे.
याबाबत मिळालली माहिती अशी की, लोढ्याजवळील मांजरपै येथील माजी सैनिक प्रभाकर डिगेकर हे मंगळवारी सकाळी नेहमी प्रमाणे आपल्या शेताकडे जात असताना वाटेतच अस्वलाने हल्ला चढविला. मात्र माजी सैनिक प्रभाकर डिगेकर यानी अस्वलाबरोबर झटापटी करत अस्वलाच्या तावडीतुन सुटका करण्यासाठी प्रयत्न केला. या झटापटीत अस्वलाने त्याच्या पायाचा चावा घेतला. छातीवर, हातीवर व पाठीवर नखाने ओरबडुन रक्तबंबाळ केले. या झटापटीत माजी सैनिकाने आरडाओरड करताच, आजूबाजुच्या शिवारातील शेतकरी धावुन आले . अस्वलाला पळवुन लावले. त्यामुळे माजी सैनिकाचा प्राण वाचला. लागलीच शेतकर्यानी या घटनेची माहिती वनविभागाला कळविली. तर माजी सैनिक प्रभाकर डिगेकर याना लागली उपचारासाठी खानापूर सरकारी दवाखान्यात दाखल केले.