IMG_20240529_112455

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :

खानापूरच्या भाजपा नेत्यांनी, महामार्गात जमिनी गमावलेल्या शेतकर्‍यांची नुकसान भरपाई भले नाही दिली तरी चालेल ? पण आमच्या गाड्या गणेबैल टोलवरून फुकट सोडा, ही विचारधारा घेऊन शेतकर्‍यांच्या खांद्यावर आंदोलनाची बंदूक ठेऊन शेतकर्‍यांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला.
महामार्गा मध्ये जमिनी गमावलेल्या शेतकर्‍यांचे जणू काही आपणच कैवारी आहोत असे भासवून शेतकर्‍यांच्या जीवावर चमकूगिरी करणार्‍या भाजपा नेत्यांनी आपल्या वाहनांचे टोल माफ करून घेतलेले आहेत, ही पूर्णपणे नुकसान सहन करणार्‍या शेतकर्‍यांची निव्वळ फसवणूक भाजपा नेत्यांनी केलेली आहे. असा आरोप खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. या विरोधात मंगळवारी गणेबेल टोल नाक्यावर तब्बल दोन तासाहून अधिक काळ आंदोलन करून तालुक्यातील जनतेला एक न्याय व भाजप नेत्यांना एक न्याय का असा सवाल करत आंदोलन छेडले. दरम्यान टोल कंपनीवर तसेच ज्यांनी या टोल माफीचा उपभोग घेत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी या आंदोलन दरम्यान करण्यात आली.


खानापूर बेळगाव दरम्यान बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्गावर गनेबल नजीक टोल उभारण्यात आला आणि खानापूर तालुक्यासह या भागातून येणाऱ्या नागरिकांच्या खिशाला कात्री लागली. या महामार्गात लाख मोलाच्या जमिनी गमावलेल्या बर्याच शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली नाहीच, किंबहुना मिळवून तर दिली नाहीच..पण 30 रुपये असणारी टोलची किरकोळ रक्कम, जो तालुक्यातील सर्व सामान्य माणूस ही भरत आहे, ती वाचविण्यासाठी इतक्या खालच्या पातळीची चिंदीगिरी करून खानापूर तालुक्यातील भाजपा नेत्यांनी आपली कोती मनोवृत्ती तालुक्याच्या निदर्शनास आणून दिली असल्याचा आरोप खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे नेते ॲड ईश्वर घाडी यांनी केले आहे.

मंगळवारी कॉंग्रेस पक्षाने या संदर्भात आवाज़ उठविला व टोलवर निदर्शने व रास्ता रोको करून सलग दोन सव्वा दोन तास टोल बंद पाडला. यावेळी हजारो वाहने टोलच्या दुतर्फा उभी होती.
या टोलचोरी संदर्भात कॉंग्रेस पक्षाने केलेल्या धडक कारवाईमुळे खानापूर पोलीस स्टेशन मधे आज रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील चमकुगीरी करणाऱ्या भाजपा नेत्यांचे पितळ संपूर्ण तालुक्यातील जनतेसमोर उघडं झाले असल्याचा आरोप ब्लॉक काँग्रेसचे सुरेश जाधव यांनी केला आहे.

सदर टोलचोरी करणाऱ्या वाहनांचे जेव्हा नंबर तपासले गेले तेव्हा अनेक धक्कादायक नावे समोर आली आहेत, यामधे भाजपच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधींच्या साखर कारखान्याच्या अनेक वाहनांची नोंद आढळून आली आहे यासंदर्भातील सत्यता तपासण्याचे काम खानापूर पोलीस करतील तालुकास्तरीय अनेक बड्या नेत्यांची तथा भाजपाच्या एका युवा नेत्याची, अशा इतर अनेक जणांच्या वाहनांची नोंद आढळून आल्याचे समजतयं, याची सत्यता पोलीसांनी तपासावी अशी मागणी पोलीसांकडे केली आहे.

गणेबैल टोलनाक्याचा मनमानी कारभार !शेतकरी वाऱ्यावर

१. कित्तेक महिने उलटून गेले तरी NHAI ने व केंद्र सरकार ने आपला शब्द पाळला नाही, शेतकरी भरपाई चा विषय अजून पेंडीग ठेवला आहे. शेतकर्यांना भरपाई दिली गेली नाही.

२. टोलनाक्यावर लोकल गाड्यांना सुद्धा त्रास दिला जातो. लोकल गाड्यांना टोलमांफी मिळाली पाहीजे. साधारण ५ किमी च्या आतील अंतरातील गावातील सर्व वाहनांना टोल माफी मिळायलाच पाहीजे.

३. खानापूर बीजेपी च्या लोकांना टोलमाफी व सामान्य जनता मात्र टोलवर नरक यातना भोगतेय… सामान्यांना टोल आणि बीजेपीच्या लोकांना टोल मधून सुटका
यावर सुद्धा कायदेशीर कारवाई झाली पाहीजे.

खानापूर बीजेपी ने जे पाठीमागे टोलवर आंदोलन केले होते ते शेतकऱ्यांसाठी होते की स्वताच्या पक्षाच्या लोकांना टोलमाफी साठी केले होते. गणेबैल टोकनाक्यावर जे बूथ आहेत त्या प्रत्येक बूथवर टोलमाफी असणार्या गाड्यांची लिस्ट लावली आहे. खानापूर तालुक्यातील प्रमुख बडा नेत्यासह एका संस्थेच्या तथा भाजप काही लोकांना टोलमाफी मिळाली आहे अशी माहिती मिळतं आहे याची सत्यता तपासण्याचे काम पोलीस प्रशासनाचे आहे.
ज्या गाड्यांना टोलमधून सुट नाही असे असतांना दादागिरी करून टोलमाफी मिळविली आहे का ?
सन्मानीय आमदार साहेब यासंदर्भात काही बोलतील का ? अशा या अन्यायाविरूद्ध आज कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गणेबैल टोलवर आंदोलन करून रस्ता रोको केला.

खानापूर सीपीआय व टोलनाक्यावरील अधिकाऱ्यांनी मिळून एसी व डीसी यांचेशी बोलणे करून दिले, सर्व सरकारी अधिकारी ४ जून च्या मतमोजणी प्रक्रियेत व्यस्त असल्यामुळे ५ जून नंतर यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

तसेच तात्पुरती व्यवस्था म्हणून लोकल गाड्यांना सहकार्य करण्याची भूमिका पोलीस प्रशासन व टोलच्या लोकांनी घेतली आहे. तसेच ज्या ज्या बीजेपीच्या लोकांच्या गाड्या गणेबैल टोलवर टोल न भरता सोडून दिल्या जात होत्या त्या सर्व गाड्या विरूद्ध तसेच टोलच्या अधिकाऱ्यांविरूद्ध पोलीस तक्रार देण्यात आली आहे. यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे. अशी माहिती खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

अन्यथा.. दहा जूनला तीव्र आंदोलन !

गणे बैल टोल नाक्यावर जमिनी गेलेल्या शेतकऱ्यावर अन्याय व बड्या नेत्यांना आश्रय अशा पद्धतीचा दुजाभाव करण्यात आला आहे हे साप चुकीचे आहे खानापूर तालुक्यातील जनतेवर झालेला हा अन्याय दूर करण्यासाठी तसेच या टोल पासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरापर्यंत टोल माफी प्रक्रिया ठेवण्यात यावी या सर्व बाबींची पुर्तता जर झाली नाही तर येत्या १० जून ला कॉंग्रेस तर्फे ज़ोरदार “जेल भरो आंदोलन” छेड़ले जाईल असा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

सर्वात महत्वाचे आजचे आंदोलन हे तात्पुरते “मतमोजणी प्रक्रियेमधे स्टाफ व अधिकारी वर्ग” व्यस्त असल्यामुळे स्थगित केले आहे.

आजच्या आंदोलनाला ॲड. ईश्वर घाडी साहेब,सुरेश भाऊ, यशवंत बीरजे, विनायक मुतगेकर, प्रसाद पाटील, जोतीबा गुरव महादेव गुरव, रामचंद्र पाटील, रूद्राप्पा पाटील,
तोहीत चांदखन्नावर, इसाक पठाण, रमेश पाटील तसेच पत्रकार वासुदेव चौगुले, विवेक गिरी, प्रसन्ना कुसकर्णी तसेच स्थानिक जनता, स्थानिक गाड्यांचे मालक, वगैरे सर्वजण उपस्थित होती.

गणेबैल टोलनाक्यांवर ज्या गाड्यांना बेकायदेशीरपणे टोलमाफी दिली आहे त्या गाड्यांची लिस्ट आम्ही खाली देत आहोत.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us