खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
- बेळगाव पणजी वाया अनमोल या राष्ट्रीय महामार्गापैकी होनकल ते रामनगर, अनमोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम या ना त्या कारणे वारंवार रखडत चालले आहे. दोन महिन्यापूर्वी सदर महामार्गाचे काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश संबंधित कंत्राट दराला महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी भुवनेश्वर यांनी दिले होते. त्यानुसार बऱ्याच अंशी काम पूर्ण झाले असले तरी खानापूर ते लोंढा तसेच अनमोल पर्यंत ठीक ठिकाणी काम अर्धवट आहे. परंतु आचारसंहिता लागू झाल्यानंतर या महामार्गाचे काम रखडले. त्यामुळे महामार्गाचे काम यावर्षी तरी पूर्ण होईल का? असा प्रश्न उपस्थित झाला. दरम्यान आमदार विठ्ठल हलगेकर सहशिष्ट मंडळाने धारवाड येथे महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी भुवनेश्वर यांची भेट घेऊन आता आचारसंहिता संपली आता तरी महामार्ग काम सुरू करा अशी विनंती सदर अधिकाऱ्यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या समवेत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपा राज्य महिला मोर्चा सेक्रेटरी धनश्री सरदेसाई, अभिजीत चांदीलकर आदि उपस्थित होते.