IMG_20240429_134103


खानापूर लाईव न्युज/ प्रतिनिधी:

  • येत्या सात मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या 17 व्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडे कोट बंदोबस्त व जयत तयारी पोलीस प्रशासनासह निवडणूक आयोगाने घेतली आहे. उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्रातील खानापूर या ठिकाणी खानापूर पोलीस ठाण्याच्या वतीने खानापूर शहरात सोमवारी पतसचरण करण्यात आले. पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक गुन्हे विभागाचे पोलीस हवालदार, कॉन्स्टेबल, या पतसंचलनामध्ये सहभागी झाले होते. येथील पोलीस ठाण्यापासून शिवस्मारक चौक, बाजारपेठ, चिरमुर्कर, देसाई गल्ली, जुनी बाजारपेठ मार्गे विविध मार्गातून हे पतसंचलन करण्यात आले.
  • येत्या 7 मे रोजी संपूर्ण उत्तर कन्नड सह कर्नाटकातील 14 लोकसभा क्षेत्रामध्ये निवडणूक होणार आहे. या सर्वच ठिकाणी जयत तयारी निवडणूक आयोगाने हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून खानापूर या ठिकाणी देखील पोलीस प्रशासनाने पतसंंचालन करून शांततेत व उत्साही मतदान करण्यात यावे यासाठी आवाहन केले.
  • निवडणूक आयोगाच्या वतीने देखील जायत तयारी हाती घेण्यात आली असून आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून प्रशिक्षणही देण्यात येत आहे. खानापूर तालुक्यात तीनशेहून अधिक मतदान केंद्रावर कडेपोट बंदोबस्त ठेवण्यास या दृष्टिकोनातून प्रशासनाने क्रम हाती घेतले आहेत. संवेदनशील अति संवेदनशील मतदान केंद्राच्या ठिकाणी स्वीप कमिटीच्या वतीने पाहनी तसेच जागृती अभियानही हाती घेण्यात आले आहे.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us