- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या दोन दिवसात प्रत्यक्षात प्रचाराला जोरात सुरुवात होणार आहे. कारवार लोकसभा मतदारसंघ हा गेल्या 16 निवडणुकात दहा वेळा काँग्रेस तर सहा वेळा भाजपचा बालेकिल्ला राहिला पण यावेळी या बालेकिल्ल्यत गड कोण राखणार याकडे लक्ष लागले आहे. एकंदरीत कारवार जिल्ह्यातील सद्य परिस्थितीचा मागवा काही खाजगी सर्वेक्षण आणि केला असून सद्य परिस्थितीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अग्रेसर असल्याचे काही खाजगी सर्वेक्षण संस्था आणि समोर आणले असल्याचे चर्चेत आहे.
- उत्तरा कन्नड लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी निवडणूक होणार आहे. यावेळी जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट स्पर्धा असून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने त्यांचे पारडे जड आहे. याला कारणेही तशीच आहेत. त्यामुळे गेल्या सहा निवडणुकात गड राखलेल्या भाजपला कसरत करावी लागणार का.? की विश्वेश्वर हेगडे आपली छाप पाडवणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. काही बाबतीत काँग्रेस भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तरा कन्नड लोकसभा मतदारसंघातून अनंतकुमार हेगडे निवडून आले. मात्र यावेळी भाजपाने अनंत कुमार हेगडे यांना डावलून विश्वेश्वर हेगडे यांना उमेदवारी दिल्याने अनंत कुमार हेगडे यांचे अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. अनंत कुमार हेगडे या क्षेत्रातून सहा वेळा निवडून आले. एकीकडे त्यांनी या क्षेत्राच्या विकासाकडे केलेले दुर्लक्ष यामुळे भाजपकडे प्रचाराचा मुद्दा नाही दुसरीकडे अनंत कुमार हेगडे समर्थक कार्यकर्ते आजही त्यांच्या इशाऱ्यावर काम करणारे आहेत पण निवडणुकीला केवळ मोजकेच दिवस शिल्लक आहेत तरीही खासदार अनंत कमार हेगडे यांनी आत्तापर्यंत कुठेही प्रचाराला बाहेर पडले नाहीत त्यामुळे त्यांचे खंदे कार्यकर्ते काय भूमिका घेणार हा ही प्रश्न निरुत्तरित आहे. त्यामुळे भाजप समोर मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे अनेक कार्यकर्ते अजूनही कागिरी यांना उघडपणे पाठिंबा देत नसल्याचे सांगण्यात येत आहे.अनंत कुमार यांनी विश्वेश्वर हेगडे यांना पाठिंबा दिला खरा पण अंतर्गतदृष्ट्या भाजपच्या उमेदवाराला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
- कारवार जिल्ह्य़ातील यल्लापूर मतदारसंघात भाजपचे आमदार असूनही पक्षाला अपेक्षित असलेला जनाधार नसल्याचे सांगण्यात येते. यापूर्वीच काँग्रेसमध्ये दाखल झालेले आमदार शिवराम हेब्ब्बार हे भाजपमध्ये असले तरी त्यांनी अंतर्गत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.. हेब्बार यांचे जिल्ह्य़ात स्वत:चे समर्थक असून त्यातील बहुतांश काँग्रेसला पाठिंबा असल्याने कागेरी यांना मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच शिवराम हेब्बर यांचे मुलगे विवेक हेबार हे जाहीरपणे काँग्रेसचा प्रवेश करून प्रचाराल लागले आहेत.
- हेब्बार आणि अनंतकुमार हेगडे यांच्यात कागेरी मधूनही नाराज असल्याने मोठा झटका बसणार असून ही भाजपसाठी डोकेदुखी ठरल्याचे बोलले जात आहे. काही सर्वेक्षणात दुसरीकडे, प्रत्येक लोकसभा निवडणूक झाली. मात्र यावेळी भाजपमध्ये हिंदुत्वाच्या शस्त्राचा प्रयोग करण्यात अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे. उमेदवार कागेरी यांचा दुबई दौरा आणि इतर फोटो व्हायरल झाल्याने हिंदू धर्माची लाट निर्माण करण्यात अपयश आल्याचे बोलले जात आहे.
- दुसरीकडे भाजप उमेदवार कागेरी यांनी प्रभारी मंत्री असताना कारवार जिल्ह्याचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला. आणि किनारी भागाप्रती असलेली उदासीनता यावेळी किनारी भागातील मतदारांची असून याचाही मोठा परिणाम निवडणुकीवर होणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस सरकारच्या पाच हमी योजनांचा यावेळी भाजपवरही मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे. गृहलक्ष्मी गृहज्योती, युवा निधीशक्ती आणि अन्नभाग्य योजनेचा लाभ घेतलेले अनेक लोक काँग्रेसच्या बाजूने उभे आहेत, विशेषत: महिला मतदार काँग्रेसचा हात धरून आहेत.
- हल्याळ , खानापूर , जोयडा दांडेली भागात मराठा समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. या भागातील मराठा समाजाने नेहमी यावेळी पक्ष मतभेद बाजूला ठेवून समाजातील प्रतिनिधीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे अनेक ठिकाणी मराठा समुदायाची प्रतिनिधी तसा प्रचार ही करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मताधिक असलेल्या मराठा समुदायाची मते ही यावेळी निर्णायक ठरणारा असल्याने डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांना याचा फायदा होणार अशी ही चिन्हे दिसून येत आहेत.
- जिल्ह्यावर काँग्रेसचे राजकीय वर्चस्व!
- कारवार जिल्ह्यात सहा तर बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर खानापूर तालुक्यातून दोन असे एकूण उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्रात आठ आमदार विधानसभा क्षेत्र आहेत यामध्ये सध्या परिस्थितीत पाच आमदार काँग्रेसचे तर उर्वरित तीन आमदार भाजपचे आहेत पण या उर्वरित तीन भाजपचे आमदारांमध्ये शिरशी यल्लापूरचे आमदार शिवराम हेब्बार यांनीही मवाळ भूमिका घेतल्याने त्या ठिकाणी भाजपला आघाडी गाठणे कठीण आहे शिवाय खानापूर हा माजी आमदार व काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर यांचा भाग आहे या ठिकाणी त्यांनी माजी आमदार म्हणून निवडून आल्याने यावेळी त्यांच्या मागील आमदारकीच्या कार्याची ओळख व स्थानिक असल्याने त्यांना खानापूर तालुका यावेळी उच्चांकी मतदान देणार आहे त्यामुळे भाजपच्या आघाडीला खानापुरातूनही काटे की टक्कर होणार आहे. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या लोकसभा क्षेत्रात प्रत्येक आमदार आपल्या परीने आपल्या क्षेत्रात आघाडी घेण्यास समर्थ जर ठरले तर काँग्रेसची आघाडी ही नक्कीच राहणार अशी चित्रे दिसून येत आहेत.
- भाजपमध्ये यावेळी उमेदवार विजयी झालाच पाहिजे, असा सूर सध्या माजी आमदार आणि भाजप नेत्यांनी पुढे केला आहे. तर दुसरीकडे मंत्री मंकाळू वैद्य व माजी मंत्री आर.व्ही.देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे.
- यावेळी भाजप उमेदवाराला फटका बसू नये यासाठी पंतप्रधान मोदींना जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काँग्रेसचे उमेदवार मराठा असल्याने मराठा यांच्या मतांवर डोळा ठेवून मराठा उमेदवार आणण्याचा प्रयत्न हल्याळ भागात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसमध्ये सीएम सिद्धरामय्या कुमठा आणि मुंडगोड येथे प्रचारासाठी येणार असल्याचे चित्र आहे.