IMG-20240420-WA0044
  • एम के हुबळी/उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्राच्या काँग्रेस उमेदवार डॉक्टर अंजली ते निंबाळकर यांचा शनिवारी कित्तूर विधानसभा क्षेत्रातील अनेक जिल्हा पंचायत क्षेत्रात दौरा झाला. सायंकाळी एम के हुबळी येथे त्यांची भव्य रॅली झाली. त्यानंतर सभा तिथून चीकबागेवाडी या ठिकाणी सभा झाली. यावेळी डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांच्या समवेत कित्तूर विभागाचे आमदार बाबासाहेब पाटील, काँग्रेस नेत्या रोहिणी पाटील, शंकर बडगेर, संगणगौडा पाटील, आनंद हम्पनावर यासह या भागातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी कलभावी, काद्रोळी, एम. के हुबळी, चिक्क बागेवाडी पर्यंत जंगी स्वागत व भव्य रॅली झाली.

  • चिक बागेवाडी येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना डॉ. अंजली निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. गेल्या दहा वर्षात केंद्रातील भाजप सरकारने केवळ शेतकऱ्या विरोधात धोरण आपले आहे. कोरोना नंतरच्या काळात शेतकरी संकटात सापडला असतानाही अशा शेतकऱ्यांना न्याय देण्यात आला नाही. केवळ आश्वासने देण्याचे काम भाजपने केले आहे. उत्तर कन्नड भागात खासदार हेगडे यांनी केवळ पदाचा उपभोग घेत या भागाकडे साप दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या भागाचा विकास रखडला आहे. यासाठी आता वेळ आली आहे. यासाठी प्रत्येकाने काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहून या भागाच्या विकासासाठी कटिबंद्ध रहावे. असे आवाहन डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी केले.

विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिला श्रद्धांजली ! निषेध

  • हुबळी येथे कॉलेज विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिच्या अमानुष हत्या बद्दल यावेळी दुःख व्यक्त करण्यात आले. कॅन्डल पेटून तिला श्रद्धांजली वाहण्यात आली. नेहा हिरेमठ हिची हत्या केलेल्या मारेकऱ्यांला क** शिक्षा झाली पाहिजेत. असे उद्गार यावेळी माजी आमदार अंजली निंबाळकर आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.
  • यावेळी बोलताना काँग्रेसने रोहिणी पाटील म्हणाल्या, आज काँग्रेस पक्षाने उत्तर कन्नडच्या उत्तर भागात काँग्रेसचे उमेदवारी देऊन महिलांचा सन्मान वाढवला आहे या भागाच्या विकास साठी आत्तापर्यंत भाजपच्या खासदारांनी कहीच प्रयत्न केले नाहीत. शेतकऱ्यांच्या समस्या असोत किंवा केंद्र सरकारच्या योजना असो केवळ आश्वासने देण्यात भाजपने काहीच केले नाही. कोरोना काळात मृत पावलेल्या स्वर्गीय माजी मंत्री बाबा गौडा पाटील असोत किंवा सर्वसामान्य नागरिक असोत कोणाच्याही जाण्याची गय तात्कालीन भाजप सरकारने केली नाही. अशा पोकळ आश्वासने देऊन जनतेला फसवणाऱ्या भाजपला हातभार करण्यासाठी मतदारांनी सज्ज राहिले पाहिजेत व काँग्रेसला निवडून आपला प्रतिनिधी दिल्लीत पाठवला तरच या भागाचा विकास होईल असे त्या म्हणाल्या. दिवसभरात डॉक्टरांजलीताई निंबाळकर यांच्या अनेक प्रचार सभा झाल्या. या सभांना प्रचंड गर्दी होती. प्रत्येक ठिकाणी अंजलीताई आबा घेऊन हम तुम्हारे साथ आहेत अशा घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

  • यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनीही कार्यकर्त्यांना उद्देशून विधानसभेच्या निवडणुकीत जसे उच्चांकी मतदान देऊन कित्तूरचा गड काँग्रेसच्या ताब्यात ठेवलात अशाच पद्धतीची उच्चांकी मतदान कित्तूर मतदारसंघातून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन केले.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us