IMG-20240418-WA0001

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:

  • देशाच्या लोकशाहीत परकेपणाची वागणूक देणाऱ्या स्थानिक नेत्यांनी प्रथमतः आत्मचिंतन करावे. भाजपाचे अनेक नेते या राज्यातून त्या राज्यात, या क्षेत्रातून त्या क्षेत्रात.. अनेक वेळा निवडणुका लढवून तक्त गाजवत आहेत. पण आज खानापूर तालुक्यात एक महाराष्ट्राची लेक या ठिकाणी स्थायिक होऊन या भागाच्या विकासासाठी खानापूर तालुक्याच्या आमदार होऊ शकते. खानापूर तालुक्यातील जनता त्यांच्या कार्याच्या पाठीशी राहून पुन्हा आशीर्वाद देण्यासाठी सज्ज आहे. अशा डॉक्टर अंजली निंबाळकर ह्या तालुक्यातील नव्हे त्या परक्या आहेत, असा टाहो फोडणाऱ्या भाजप नेत्यांचा डॉ. अंजली निंबाळकर यांनी चांगलाच समाचार घेतला. जर आम्ही परप्रांतातून किंवा परक्या आहोत तर तुमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात मधून वाराणसीत, बेळगावचे भाजप उमेदवार जगदीश शेठर धारवाडचे ते बेळगावला चालतात,अशी किती उदाहरणे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत हे तुम्हाला चालतात पण या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या एका महिला नेतृत्वाला परकेपणाची वागूणूक देताना महाराष्ट्रातील सर्व दैवते, महाराष्ट्रातील सुना ,जावई चालतात आणि राजकारणात आम्ही चालत नाही का? असा सवाल डॉ. अंजली निंबाळकर यांनी व्यक्त केला गर्लगुंजी येथे आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी त्या बोलताना म्हणाल्या, कर्नाटकात काँग्रेस सरकारने गॅरंटी कार्ड योजनेतून लोकांना “जगण्यासाठी साथ व आर्थिक मदतीचा हात” दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वसामान्य गोरगरीब जनता काँग्रेसला विसरणार नाहीत, याची खात्री आम्हाला आहे. आज खानापूर तालुक्यात गेल्या 25 वर्षात भाजपा खासदारने काय दिवे लावले आहेत. त्यांनी केलेल्या विकास कामाचा आढावा भाजप नेत्यांनी प्रथमतः मांडावा नंतरच आम्हाला शहाणपण शिकवावे. आज राज्यातील जनतेला गॅरंटी योजनांमुळे जगण्याचे समर्थ मिळाले आहे. अनेकांच्या चुली पेटत आहेत. महिलांच्या खात्यावर जमा होणारे अर्थसहाय्य हे कुटुंबाला जगण्याचे व जगवण्याचे एक आर्थिक पाठबळ असून आपली जनता कधीच करणार नाही. यापुढेही खानापूर, कारवार भागाचा आवाज दिल्लीच्या तक्तावर पोहोचवण्यासाठी, तालुक्याचा तसेच उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्राचा विकास साधण्यासाठी पुन्हा एकदा या तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मतदार बंधू भगिनी यांनी द्यावी असे भावनिक उद्गार डॉ. अंजली निंबाळकर यांनी व्यक्त केले. निटूर, इदलहोंड, हलकर्णी तसेच गर्लगुंजी येथे ग्रामपंचायत पातळीवरील कोपराचे प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
  • भाजप म्हणजे भडव्यांचा तथा भाडोत्री पक्ष:
  • गर्लगुंजी येथे बोलताना सामाजिक कार्यकर्ते यशवंत बिरजे यांनी गेल्या अनेक लोकसभांच्या निवडणुका तालुक्यातील मराठी भाषिक व समितीने अनेकदा काँग्रेसला पाठबळ दिले आहे. आजही आपल्या खानापूर तालुक्यातील एक हक्काची व समाजातील नेतृत्व करणाऱ्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना विमुद्रे मिळाल्यामुळे आज खानापूर तालुक्याचा सन्मान वाढला आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने नाहक परकेपणाची वागणूक देणे हे चुकीचे आहे . भाजपाने देशात केवळ भांडणे लावून दुसऱ्याची घरे मोडण्याचे काम केले आहे महाराष्ट्रामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे सारख्या महाना नेतृत्वाला झुगारून त्यांचा पक्ष फोडण्याचे काम भाजपाने केले आहे. त्यामुळे भाजप पक्ष हा भडव्यांचा व भाडोत्री पक्ष आहे. या अशा पक्षाच्या पाठीमागे न लागता मतदाराने विकासाचे पाऊल असलेल्या व ज्या शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी सीमा प्रश्नांसाठी आतापर्यंत दिलेल्या योगदानाचा विचार करता तालुक्यातील तमाम महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मतदारांनी इंडिया आघाडीमध्ये असलेल्या या सरकारला पाठिंबा देऊन निवडून आणावे व तालुक्यातून डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांना दिलेला आपला प्रतिनिधी पाठवावा असे आवाहन केले.
  • हलकर्णी येथील प्रचार सभेत एडवोकेट ईश्वर घाडी, यांनी काँग्रेसच्या अनेक योजनांचा पाढा वाचला आज प्रत्येक सर्वसामान्य मनुष्याला जगण्यासाठी काँग्रेस पक्षाने अनेक योजना भारत स्वातंत्र्य झाल्यापासून अमलात आणले आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये देशात मोदी सरकारने केवळ आश्वासनाची घोषणा केली आहे. मात्र प्रत्यक्षात गोरगरिबांच्या खिशात काय पडले याचा विचार मात्र या सरकारला नाही. मात्र काँग्रेस सरकारने गॅरंटी कार्ड देऊन या लोकांना जगण्याची हमी व ऊर्जा दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत देखील काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे जनता राहील असे त्यांनी सांगितले. यावेळी तालुका ग्रामपंचायत युनियनचे अध्यक्ष विनायक मुदगेकर म्हणाले गेल्या 30 वर्षात खानापूर तालुक्यातून उच्चांक घेऊन निवडून आलेल्या खासदार अनंत हेगडे यांनी काय दिवे लावले आहेत, हे तालुक्याला माहित आहे. तालुक्यात अनेक ज्वलंत समस्या निर्माण झाल्या त्या समस्या निवारण्यासाठी कधीही त्यांनी फिरकले नाहीत. अंजना हणबर यांच्यावर वाघाचा हल्ला असो किंवा राष्ट्रीय महामार्गाचा विकास , कोरोना काळातील दुर्लक्षपणा अशा अनेक बाबी समोर आहेत, त्यामुळे भाजपने खानापूर तालुक्यात लोकसभेसाठी मतदान मागण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. यासाठी तालुक्यातील जनतेने आता आपल्या हक्काच्या व तालुक्यातील माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आपल्या समाजाचा एक प्रतिनिधी दिल्लीत पाठवावा व या कारभार लोकसभा क्षेत्राचा विकास साधावा असे आवाहन केले.
  • यावेळी कोपरा सभेत बोलताना महादेव घाडी केवळ मुखात राम म्हणून चालणार नाही. हाताला कामही पाहिजे आणि ते काम काँग्रेस पक्षाने देण्याचे काम केले आहे. केवळ जातीयवाद व समाजात तिढा निर्माण करून मत रचना करून देशाचा विकास होणार नाही राबणाऱ्या लोकांच्या हातात काम देऊन राजकारण करणे हे जरुरीचे आहे. ते काम काँग्रेस सरकारने केले असून आज सरकारच्या गॅरंटी योजना सह देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर कर्जमाफी महिलांच्या खात्यावर लाख रुपये अशा अनेक योजना आखल्या गेल्या आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी आज काँग्रेसच्या पाठीशी उभे राहणे काळाची गरज असल्याचे विचार मांडले. यावेळी गर्लगुंजीचे ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून गर्लगुंजी भागात डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी राबवलेल्या योजना व तालुक्यात आज डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची का गरज आहे याबद्दल विवेचन केले. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यासह अनेक पदाधिकारी गर्लगुंजीतील नागरिक ग्रामपंचायत सदस्य व परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us