कारवार : : उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघात प्रदेश काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ .अंजली निंबाळकर यांच्या उमेदवारीबद्दल मराठा समाजाला मराठा पिंडा अर्थात मराठा पिडा (गर्भ )असा शब्द वापरून मराठी जातीचा अपमान केला आहे. आपल्या सोशल मीडियावर डॉक्टर अंजली निंबाळकर या मराठा असल्याने ही त्यांना उद्देशून उत्तर कन्नड मध्ये मराठा पिढा कशाला आणला असा अपशब्द वापरून मराठा समाजाचा अपमान कुमठा येथील भाजपा कार्यकर्त्याने केला असून त्याच्या विरोधात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आर् एच नायक यांनी त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
काँग्रेस पक्षाने मराठा समाजाला यावेळी नेतृत्व देत उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्रात उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाने यावेळी काँग्रेस पक्षाला अभय दिले असून चांगला पाठिंबाही मिळत आहे. मात्र मराठा समाजाला काँग्रेस पक्षाने दिलेली ही भाजप कार्यकर्ता श्रीकांत हेगडे अंतरावली यांना खटाकल्याने त्यांनी यांनी सोशल मीडियावर मराठी पिंडा असा शब्द वापरून एका समाजाचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसच्या कुमठा येथील काँग्रेसचे उपाध्यक्ष आर एच नायक यांनी कुमठा पोलीस ठाण्यात श्रीकांत हेगडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष आर् एच नायक यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या उमेदवाराच्या समर्थनार्थ त्यांनी शनिवारी कारवार प्रेस हाऊस येथे पत्रकार परिषद घेतली, हा व्हिडिओ काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे सूरज नायक यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. याला कुमठा तालुक्यातील अंत्रवल्ली येथील भाजपचे श्रीकांत हेगडे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून अपशब्द मराठी पिंडा म्हटले. असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
ते म्हणाले, मराठी पिढा ही संज्ञा असंवैधानिक आणि जाती समाजाचा अपमान करणारी असल्याने तक्रार दाखल करण्यात आल्याची टिप्पणी त्यांनी केली. त्याला अटक करून खटला चालवावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. श्रीकांत हेगडे अंतरावली यांच्या विरोधात कुमठा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोशल नेटवर्क्समधील निवडणुकीच्या संदर्भात पक्ष आणि उमेदवार एकमेकांच्या विरोधात असणे स्वाभाविक आहे. मात्र त्यांच्या जातीला लक्ष्य करून काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांचा अपमान करणे अक्षम्य आहे. जाती-जातींमध्ये तेढ पेरणाऱ्या भाजपने पुन्हा पुन्हा तेच सुरू ठेवले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वैयक्तिक आणि असभ्यपणे शिवीगाळ करणाऱ्यांना ही तक्रार धडा ठरावी. या निवडणूक अधिकाऱ्यांनीही लक्ष घालून कारवाई करावी, असा आग्रह आर एच नायक यांनी धरला. यावेळी उत्तर कन्नड जिल्ह्यात काँग्रेस समर्थक लाट आहे. सध्या काँग्रेसला पोषक असे वातावरण निर्माण झाल्याने उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाचा प्रचार जोरात सुरू आहे. त्यामुळे भाजपाला तो खटकत असल्याने ते सहन झाले नाही त्यामुळे भाजपच्या त्या कार्यकर्त्याने मराठा समाजाला टार्गेट करून अशा पद्धतीने मते मिळवण्याचा हा प्रकार भाजपने अवलंबला असल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली. यावेळी काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे सुरज नायक, अजय सिगली, अशरफ आदी उपस्थित होते.
मराठा समाज ठोशास ठोसा देणार!
ॲड ईश्वर घाडी
मराठा समाजाला उद्देशून वापरलेला शब्द हा मराठा समाजाचा एक प्रकारे अपमान आहे. मराठा समाज हा शिवाजी महाराजांचा वंशज आहे तो अपमान कधीही सहन करणारा नाही. उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्रात सर्व जातीय धर्मीय पंथीय लोक आहेत. परंतु एका समाजाचा उमेदवार असल्याने त्याला मराठा पीडा असा शब्द वापरून त्यांचा अपमान करणे हे निंदनीय आहे. वास्तविक उत्तर कन्नडमध्ये जवळपास तीन लाखापेक्षा अधिक मराठा मतदार आहेत हा संपूर्ण मराठा समाजाचा अपमान आहे. याकरता आता मराठा समाजाने त्याचे चोख उत्तर मतदानाच्या स्वरूपात दिले पाहिजे. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर ह्या मराठा समाजाच्या आहेत. त्यांचा अपमान हा संपूर्ण मराठा समाजाचा अपमान असून आता मराठा समाज या निवडणुकीत समाजाला किंवा समाजाच्या प्रतिनिधीला डीवसण्याचा प्रकार करणाऱ्या भाजपाला चौक उत्तर दिले पाहिजे अशी प्रतिक्रिया खानापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट ईश्वर घाडी, तालुका ग्रामपंचायत असोसिएशनचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी खानापूर लाईव्ह बोलताना दिली.