खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी :
जटगे येथील हनुमान मंदिराचा पहिला वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार विठ्ठल हलगेकर उपस्थित होते. सकाळी विविधत पूजा करण्यात आली व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. व वर्धापन दिनानिमित्त संत एकनाथ भारुड मंडळ कारलगा यांचा दारूचा नाद लय बाद ह्या भारुडाचा 51 वा प्रयोग येथे सादर करण्यात आला.
भारुड समाज प्रबोधन सोबतच विनोदी कौशल्यावर अवलंबून होते. समाजामधील दांभिकता, अंधश्रध्दा व वाईट रूढी परंपरा यांच्यावर मनोरंजनातून प्रबोधन करण्यात आले.
संत एकनाथ महाराजांनी ज्याप्रमाणे त्यावेळेला समाज प्रबोधन करण्यासाठी भारुड हे माध्यम वापरलं. कीर्तने केली. त्यावेळेला समाज सुधारण्यासाठी जे योग्य होतं ते त्यांनी केलं त्याच वाटेवर आज हे एकनाथ भारुड मंडळ तरुण युवकासह हसत हसत समाज प्रबोधनाचे मोठं काम करतय त्यांच्या या चांगल्या कार्याची जटगे ग्रामस्थ मधून स्तुति करण्यात आली. या कार्यक्रमासाठी बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.