- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा जामगाव शाळेची वार्षिक स्नेहसंमेलन 28-3-2024 रोजी संपन्न झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात गावातील अनेक माजी विद्यार्थी ग्रामस्थ तसेच बाल हनुमान क्रिकेट क्लबच्या वतीने माझी शाळा आदर्श शाळा या तत्त्वाकडे शाळा वर्ग डिजिटल साठी भरीव अशी देणगी देऊन शाळेच्या वैभवात भर घातल आहे. शाळेच्या सुधारण्यासाठी हाती घेतलेल्या या ग्रामस्थांच्या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन कमिटीने त्यांचे अभिनंदन केले आहे.
- जामगाव येथील मराठी प्राथमिक शाळेच्या स्नेहा संमेलन उत्साहात पार पडला यावेळी प्रतिष्ठित नागरिक श्री महादेव गावकर (अध्यक्ष). ,श्री प्रकाश गावकर, श्री नारायण गावकर ,श्री मारुती गावकर श्री अप्पू गावकर , श्री रामा कणकुंभकर, श्री बळीराम कणकुंभकर, श्री दीपक गवाळकर, शिरोली केंद्राचे केंद्रप्रमुख श्री B.A. देसाई सर, श्री प्रशांत वंदुरे पाटील सर, श्री किशोर शितोळे सर ,श्री रमेश कवळेकर सर, श्री P.B.गावडे सर, श्री यलमंक्कनवर सर तसेच गावातील सर्व युवावर्ग महिला वर्ग आर्वजून उपस्थित होते.
- या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत वंदुरे पाटील सर यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक संदीप मधभावे यांनी केले. मनोगत अप्पू गावकर, नारायण गांवकर, मारुती गांवकर यांनी केले. श्रीमती सविता मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.
- बाल हनुमान क्रिकेट क्लब जामगाव यांनी शाळेसाठी 50 हजार रुपये देणगी दिले आहे.
- तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि इतर युवा वर्ग यांनी वार्षिक स्नेहसंमेलन पाहून 30 हजार रुपये देणगी दिली अशा प्रकारे एकूण 80 हजार रुपये शाळेस देणगी दिली आहे.
- या वार्षिक स्नेहसंमेलनात शाळेतील विद्यार्थ्यांनी खूप छानरित्या कलागुणांचे सादरीकरण केले. नृत्य, गायन,लावणी, वेस्टर्न डान्स,कॉमेडी डान्स, नाटके, पारंपारिक नृत्य, ऐतिहासिक नृत्य नाटके, फॅशन शो, आर्केस्ट्रा अशा विविधरंगी कलागुणांचे सादरीकरण केले. गावकऱ्यांकडून खूप प्रतिसाद मिळाला .
- जामगाव गावातील सर्व ग्रामस्थांचे खुप सहकार्य लाभले. स्टेज घालने. लायटिंग व्यवस्था, मुसिक, फोटोग्राफी शिवम फोटो स्टुडीओ,इतर अनेक कार्य केलेल्या सर्व आजी मजी विद्यार्थी व ग्रामस्थांचे शाळेच्या वतीने अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
- या कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी शालेय शिक्षिका श्रीमती सविता मॅडम,कु. निकिता गावकर, कु प्रतीक्षा तीनेकर, श्रीमती लक्ष्मी पाटील यांचा प्रमुख वाटा होता.