खानापूर लाईव्ह न्यूज
लोकसभा निवडणुकीत खानापूर तालुक्यातून दोन लाख १७ हजार ५२४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात १ लाख ११ हजार ५५९ पुरुष, १ लाख ५ हजार ९६० महिला आणि पाच तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. निर्भय व शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी सहा भरारी पथकांसह ३६ विभाग अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती सहायक निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण यांनी दिली.
कारवार लोकसभा मतदारसंघासाठी तहसील कार्यालयात निवडणूक अधिकारी कार्यालय सुरु करण्यात आले आहे. निवडणूक विभागाच्या तयारीची माहिती तेथे रविवारी (दि. १७) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक गावातील लोकांना तीन ते चार किलोमीटर चालत जाऊन मतदान करावे लागत होते. गावाजवळ मतदान केंद्र नसल्याने मतदानाच्या
दूर करण्यासाठी यावेळी ५० नव्या मतदान केंद्रांची स्थापना केली आहे. २४९ ठिकाणी ३१२ मतदान केंद्रांची सोय केली आहे. १९६ ठिकाणी प्रत्येकी एक तर ४५ ठिकाणी प्रत्येकी दोन केंद्रांची व्यवस्था केली आहे. पैशांचे वाटप तसेच इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सहा भरारी पथके स्थापन केली आहेत. हीकार्यरत राहणार असतील. त्यांच्यासोबत जीपीएस वाहनाची सोय असलेले व्हिडीओ देखरेख पथकही राहणार आहे. एकूण ३६ विभाग अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. कणकुंबी, लोंढा आणि लिंगनमठ या तीन ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत. कणकुंबी आणि लोंढा नाक्यावर खानापूर पोलिसांकडून तर लिंगनमठ नाक्यावर नंदगड पोलिसांकडून २४ तास तपासणी
केली जाणार आहे. लोंढा, खानापूर, तोपिनकट्टी, बिडी, हिरेमुनवळ्ळी व गंदीगवाड ही सहा संवेदनशील, तर बेटगेरी व मोरब ही दोन अतिसंवेदनशील मतदान केंद्रे आहेत, असे त्यांनी सांगितले.
आचारसंहिता उल्लंघनाचा प्रकार घडत असल्यास लीकांनी सी व्हिजिल अॅपवर अथवा १९५० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी. तासाभराच्या आत त्या तक्रारीची दखल घेतली जाईल असे चव्हाण यांनी सांगितले. विवाह सोहळा, सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम, यात्रा, उत्सव या सोहळ्यांना आचारसंहितेचे बंधन नसले तरी राजकीय नेत्यांना अशा ठिकाणी जाऊन भाषण करण्यास बंदी असल्याची माहिती त्यांनी दिली.