Screenshot_20231128_220904

उत्तराखंड :

उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी (Uttarkashi) येथे बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर सुटका करण्यात आली. या बोगद्यात 41 कामगार अडकले होते, त्यांची 17 दिवसांनी सुटका करण्यात आली. बोगद्यात अडकलेल्या या कामगारांची सुटका झाली आणि त्यांच्या कुटुंबियांनी तसेच प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी रुग्णवाहिकांचा ताफा आणि तात्पुरते रुग्णालय सज्ज ठेवण्यात आले आहे.

गेल्या 12 नोव्हेंबरपासून म्हणजेच 17 दिवसांपासून तब्बल 41 मजूर बोगद्यात अडकून पडले होते तेव्हापासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. उत्तरकाशीतील (Uttarkashi) सिल्क्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) 41 कामगार अडकल्याने देशासह जगाच्या नजरा या रेस्क्यू ऑपरेशनकडे लागल्या होत्या.

12 नोव्हेंबरच्या पहाटे उत्तरकाशीत कामगार बोगदा खणण्याचे काम करत होते. मात्र त्याचवेळी बोगद्याचा काही भाग कोसळला आणि अवाढव्य बोगदा निर्माण करणारे शिल्पकार त्यात अडकले होते. या कामगारांच्या सुटकेसाठी संपूर्ण देश आतूर झाला होता. या घटनेला आता 17 दिवस झाले आहेत. प्रचंड कष्ट, अत्याधुनिक यंत्रणांच्या मदतीने या कामगारांसाठी अन्न- पाणी, मोबाईल, तणाव कमी करण्यासाठीच्या वस्तू पाठवण्यात आल्या, आता त्यांची सुटका करण्यात आली आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us