- बेळगाव: जिल्ह्यातील निपाणी संभाजीनगर येथे शाळकरी मुलाचा निर्गुण खुन झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 8च्या सुमारास उघडकीस आली. या दुर्दैवी शाळकरी मुलाचे नाव साकीब समीर पठाण (वय 14 रा. संभाजीनगर वडार गल्ली) असे आहे. याबाबत माहिती की संभाजीनगर येथे बाळूमामा उद्यानातील एका बंद बंगल्याच्या दारात शुक्रवारी रक्ताच्या थारोळ्यात एक मृतदेह पडल्याचे फिरावयास गेलेल्या काही नागरिकांचे लक्षात आले. त्यांनी तातडीने ही माहिती पोलिसांना देण्यात आली. तासभरात मृतदेह कोणाचा आहे हे समजले नव्हते. मात्र नंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरतात हा मृतदेह सकिब शाळकरी मुलाचा असल्याचे दिसून आले दिसून आले. साकीब हा गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. तोपर्यंत घरी परतला नसल्याने गरजे लोक चिंतेत होते. सकाळी आठच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या त्या शाळकरी मुलाला पाहून अनेकांच्या काळजाचे पाणी सुटले. घटनास्थळी, निरीक्षक बीएस तळवार शहर पोलिसांकाच्या उपनिरीक्षक उमादेवी सह पोलिसांनी क्रम हाती घेतला आहे .