Screenshot_20230519_204614

चापगाव/ प्रतिनिधी : खानापूर तालुक्यात अनेक पुरातन मंदिरे विकासापासून मागे आहेत. मंदिरांच्या विकासासाठी भारतीय पुरातत्त्व खात्याच्या योजना राबवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. तालुक्यात अनेक मंदिरे धर्मादाय खात्याकडे नोंद नाहीत. अशा मंदिरांना नोंद करून घेणे गरजेचे अत्यावश्यक आहे. आज चापगाव सारख्या ठिकाणी अनेक मंदिरे पुरातन आहेत.पण जिर्णोद्वारासाठी आवश्यक निधी नसल्यामुळे अडचणीत आहेत. त्या नजीकच्या काळात पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करणार असून खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा राबवण्यात येत आहे. नजीकच्या काळात सर्वांना विश्वासात घेऊन ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत,त्या पूर्ण करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत नवनिर्वाचित आमदार विठ्ठल हलगेकर यांनी चापगाव येथे श्री 1008 आदिनाथ जैन मंदिरात अमावस्येच्या निमित्ताने आयोजित महापूजा कार्यक्रमात सत्कारमूर्ती या नात्याने बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद कोचेरी होते. व्यासपीठावर जेष्ठ संचालक डी. डी. पाटील, चापगाव ग्रामपंचायत चे माजी अध्यक्ष रमेश धबाले, पत्रकार पिराजी कुऱ्हाडे,माजी उपसभापती मल्लाप्पा मारीहाळ, महाबळेश्वर घार्शी, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय कांची, प्रभाकर मुतगी, उदय पाटील,रुद्राप्पा अंगडी महादेव दळवी, जैन युवा समितीचे कार्यकर्ते राजू पाटील, चेतन भेंडीगिरी, राजू कंची, पारीस हाणब्रेट्टी गुंडू कडबी आदी उपस्थित होते यावेळी श्री 1008 आदिनाथ मंदिर ट्रस्ट युवा समितीच्या वतीने आमदार विठ्ठल हलगेकर यांचा श्रीफळ शाल देऊन सत्कार करण्यात आला.

चापगाव युवा कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार

यावेळी चापगाव गावातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित आमदार विठ्ठल हलगेकर यांचा यावेळी सत्कार केला. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश धबाले, विष्णू चोपडे, उदय पाटील,अरुण धबाले, अनिल बेळगावकर सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री 1008 आदिनाथ मंदिराला पुरातन इतिहास

कार्यक्रमात पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यांनी प्रास्ताविक करून श्री 1008 आदिनाथ मंदिराची पुरातन माहिती व गावच्या विकासासाठी आवश्यक अडचणी या संदर्भात माहिती दिली व व नवनिर्वाचित आमदार विठ्ठल हलगेकर यांचे अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष रमेश धबाले यांनीही शुभेच्छा पर विचार मांडले.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी चापगाव येथील श्री 1008 आदिनाथ मंदिराच्या विकासासाठी गेल्या 30 वर्षापासून आपले प्रयत्न असून यापुढील काळात आमदारांच्या सहकार्यातून या भागाचा विकास करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले व जैन समुदायाच्या वतीने नवनिर्वाचित आमदारांचा त्यांनी अभिनंदनपर सत्कार केला. माझी उपसभापती मल्लाप्पा मारीहाळ यांनी तालुक्याने यावेळी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून 92 हजार मते देऊन आतापर्यंतच्या इतिहासाचा साधला असून मतदारांच्या विश्वासाला पात्र होऊन आगामी पाच वर्षात नूतन आमदार दाखवतील असे सांगून त्यांचे अभिनंदन केले व उभयतांचे आभार मानले. यानंतर महाप्रसादाने या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता झाली सकाळपासून श्री 1008 आदिनाथ मंदिरात महापूजा व प्रार्थना झाली. यावेळी खानापूर बेळगाव तालुक्यातील अनेक भक्त महिला भक्त व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us