खानापुर: नुकताच झालेल्या एस एस सी परीक्षेत खानापूर तालुक्यात उच्चांक साधून यश मिळवलेल्या कुमारी सोनाली पाटील हिचे लैला साखर कारखान्याचे ऊस विभाग प्रमुख व माजी तालुका पंचायत सदस्य बाळाराम शेलार तसेच तालुका ग्रामपंचायत चेअरमन असोसिएशन चे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी अभिनंदन केले आहे.
नागुर्डा गावचे प्रगतशील शेतकरी श्री कृष्णा पाटील यांची नात व खानापूर पी.के.पी.एस.चे माजी संचालक श्री ज्ञानेश्वर पाटील यांची कन्या कु.सोनाली ज्ञानेश्वर पाटील हिने दहावी 2023 च्या परीक्षेत 625 पैकी 615 गुण मिळवून घवघवीत यश संपादन करून खानापूर तालुक्यात प्रथम आलेली आहे. या तिच्याबद्दल तिचा श्रीफळ शहाल देऊन उभे त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.