खानापूर : विधानसभा मतदारसंघात 75.31 टक्के मतदान झाले आहे. खानापूर तालुक्याच्या 255 मतदान केंद्रामधून मतदान झाले. तालुक्यातील 2,12,650 एकूण मतदारांपैकी 1,60,160 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. संवेदनशील ते संवेदनशील अशा मतदार मतदान केंद्रावर विशेष करून कोणताही गोंधळ निर्माण झाला नाही. देवलती या ठिकाणी भाजपच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी भगव्या शाल घालून घोषणाबाजी केल्याने डॉ अंजली निंबाळकर काँग्रेसचे उमेदवार यांनी पोलिसात तक्रार केली आहे. याव्यतिरिक्त खानापूर तालुक्यामध्ये सर्वत्र शांततेत मतदान पार पडले खानापूर तालुक्यामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत केवळ 7 टक्के मतदान झाले होते.11 वाजता 19 टक्के मतदान झाले दुपारी 1 वाजता पर्यंत 35 टक्के मतदान झाले होते. तर दुपारी 3 वाजेपर्यंत 53 टक्के मतदान झाले होते. सकाळी नऊ नंतर कडक ऊन पडल्याने मतदार घरातून बाहेर पडण्यास नापसंती पसंती दर्शवली. मात्र दुपारी 3 नंतर प्रत्येक मतदार संघात मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. एकूणच खानापूर तालुक्यातील 255 मतदान केंद्रावर उत्साही मतदान झाल्याची नोंद झाली आहे. 75 टक्के मतदान झाल्याने मतदानाची टक्केवारी वाढली आहे ग्रामीण भागातील मतदार संघात साधारणता 70 ते 80 टक्के पर्यंत मतदान झाले आहे. काही मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला असा असला तरी उच्चांकी मतदानासाठी कार्यकर्त्यांनी सायंकाळनंतर विशेष प्रयत्न केले.
एकूणच खानापूर तालुक्यातील 13 उमेदवारांचे भवितव्य आता बंद पेटीत आहे त्यामुळे 13 तारखेला काय निकाल होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.