खानापूर प्रतिनिधी: खानापूर रेल्वे स्थानकावर एक गवि रेडा रेल्वेत सापडून ठार झाल्याने रेल्वे स्थानक परिसरात दुर्गंधी पसरली आहे. खानापूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या खानापुरातील सामाजिक कार्यकर्ते अप्पू बाळकट्टी यांच्या निदर्शनास आला. रेल्वे ट्रॅक मध्ये सापडलेला हा जंगली गवि रेडा की पाळीव म्हैस असावी असा संशय आहे.
तालुक्याच्या जंगल प्रदेशातून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला अनेक वेळा जंगली प्राण्यांना अपघात झाल्याचे प्रकार घडले आहेत. अशाच प्रकारे रेल्वे ट्रॅक ओलांडताना सदर गवी रेडा रेल्वेच्या ट्रॅक वर आला असावा. खानापूर रेल्वे स्टेशनच्या जवळपास एक दोन फरलांवर रेल्वे ट्रॅक वर रात्रीच्या वेळी गवि रेडा आला असावा. रेल्वे सापडल्याने फडफडत गवि रेड्याचा मृतदेह खानापूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नाजिक पडला आहे. सदर घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली असावी. त्यामुळे रेल्वे प्लॅटफॉर्म च्या बाजूला दुर्गंधी पसरली आहे.आज पहाटे मॉर्निंग ट्रॅक साठी शहरातील बरेच प्रवासी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर जातात. त्यावेळी हा प्रकार निदर्शनाला आला. या ठिकाणी दुर्गंधी पसरली असुन तातडीने वन खात्याच्या किंवा रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वे प्लॅटफॉर्म परिसरात झालेली दुर्गंधी हटवावी अशी मागणी करण्यात आली आहे.