खानापुर:: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत कर्नाटकातील मतदार यावेळी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे सरकार नक्कीच देतील यात शंका नाही कर्नाटकात डबल इंजिन सरकारने अनेक कामे राबवले आहेत. त्यामुळे कर्नाटकात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येईल, त्याचबरोबर खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल हलगेकर यांना खानापूर तालुक्यातील जनता आमदार म्हणून विधानसभेत पाठवतील आणि या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वाव मिळेल. असे विचार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खानापूर येथे शनिवारी दिली.
भाजपाचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रचाराची रणनीती व कार्यकर्त्यांची संवाद साधण्यासाठी त्यांनी शनिवारी धावती भेट दिली, ते म्हणाले केंद्रात व राज्यात भाजपचे डबल इंजिन सरकार आहे. सरकारला गोवा भाजप सरकारची ही साथ आहे.
खानापूर तालुक्यातील विशेषता गोवा भागात रोजगारासाठी असलेल्या तमाम मतदारांनी श्री विठ्ठल हलगेकर यांना मतदान करून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून द्यावा. असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. यावेळी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा श्रीफळ शाल व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उमेदवार विठ्ठल हलगेकर सह भाजपा अध्यक्ष संजय कुबल माजी आमदार अरविंद पाटील, बाबुराव देसाई, प्रमोद कोचेरी, धनश्री सरदेसाई, सुलक्षणा सावंत, किरण येळूरकर, सदानंद पाटील, सुरेश देसाई, चेतन मनेरिकर,अशोक देसाई, पंडित ओगले, मंजुळा कापसे सह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.