खानापूर : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषद व खानापूर तालुका कुस्तीगीर संघटना आणि जनसेवा फाउंडेशन खानापूर तालुका यांची संयुक्त बैठक क्षत्रिय मराठा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली होऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर गणपतराव पाटील यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला.
यावेळी तिन्ही संघटनेच्या वतीने मुरलीधर पाटील यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिरजे, खानापूर कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष तानाजीराव कदम, खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष अभिलाष देसाई, बार असोसिएशनचे अध्यक्ष ईश्वर घाडी, कुस्तीगर संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, म ए समितीचे चिटणीस एस एन बेडरे अँडवोकेट केशव कळेकर, अँडवोकेट आनंदराव देसाई, रामचंद्र खांबले, राजाराम देसाई, अर्जुन देसाई, आबासाहेब दळवी, चांगाप्पा पाटील, आधी उपस्थित होते यावेळी अनेक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना निवडून आणण्यासाठी देणगीही जाहीर केल्या.