खानापूर /प्रतिनिधी : कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना संघटनेमार्फत नोंदणीकृत असलेल्या खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेची महत्वपूर्ण बैठक सोमवार दि. 08 मे 2023 रोजी सकाळी11 वाजता खानापूर येथे श्री ज्ञानेश्वर मंदिर खानापूर या ठिकाणी बैठक बोलावली आहे या बैठकीत प्रामुख्याने मागील बैठकीचा आढावा व विषय पारित करणे. आरोग्य विषयी खानापूरचे सिव्हिल हॉस्पिटल हृदय तज्ञ यांचे मार्फत विशेष माहिती व उपाय समजून घेणे, खानापूर तालुक्यात मोफत नेत्र शिबिर हॉस्पिटल खानापूर यांचे मार्फत भरविणे व नियोजन करणे बाबत विचार विनिमय करून निर्णय घेणेव इतर विषय अध्यक्षांच्या परवानगीने चर्चा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जून ते डिसेंबर 2023 पर्यंत मासिक उपक्रमांचे नियोजन करणे तसेच सभासद वाढविणे व गुणात्मक माहिती विस्तारित व प्रसारित करणे करिता उपाय योजना ठरविणे हे सर्व विषय पारित करण्याचे आहेत करिता सर्व नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिक व विना नोंदणी ज्येष्ठ नागरिक व सामान्य नागरिक यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा
असे आवाहन अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी केले आहे अधिक माहितीसाठी अध्यक्ष श्री बनोशी सर 8277109909 व सेक्रेटरी श्री पवार सर 7619123145 संपर्कप्रमुख श्री पाटील सर 9241417357 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.