Screenshot_2023_0505_104332

नंदगड येथे भाजपची भव्य प्रचार सभा हजारो कार्यकर्त्यांसह मतदारांची उपस्थिती

नंदगड/ प्रतिनिधी: खानापूर तालुका हा मागासलेला तालुका म्हटला जातो. हे चुकीचे असून तालुका हा मागासलेला नसून तो समृद्ध आणि विकसनशील तालुका आहे. खानापूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षात विकासाभिमुख कामे राबवण्यात आत्तापर्यंतच्या प्रतिनिधींनी योग्य नियोजन केले नाही. खानापूर तालुक्यात च्या भौगोलिक परिस्थितीत पाणलोट क्षेत्राचा विकास होणे काळाची गरज आहे. पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देऊन आधुनिक शेती पद्धतीला प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पाणी देऊन शेती व्यवसाय सुधारणे आर्थिक व्यवसायात विशेष तरतूद करून खानापूर तालुक्यात औद्योगिक क्रांती बेरोजगारांना रोजगार त्याचबरोबर रस्ते व मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी प्रामुख्याने प्राधान्य देणे हा आपला अजेंडा असून या निवडणुकीमध्ये हेच विषय समोर घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. आज खानापूर तालुक्यातील जनतेने तालुक्याबाहेरील व्यक्तीला त्यांच्या घरचा रस्ता दाखवून खानापूर तालुक्यातील भूमिपुत्रालाच निवडून आणण्यासाठी तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयनिष्टता व विश्वनिष्ठता व जनमानसात केलेले स्थान व विकासाचे गणित व देशाला महासत्ताक बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी व आपल्या तालुक्याच्या मूलभूत समस्या डबल इंजिन सरकार बरोबर पूर्णत्वाला आणण्यासाठी खानापूर तालुक्यातून भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यातील जनता देईल यात शंका नाही, असेच सहकार्य येत्या दहा तारखेपर्यंत मतदान केंद्रापर्यंत जाऊन बहुमताने भाजपला निवडून द्या. त्यानंतरच्या पाच वर्षाच्या काळात मी तुमचा सेवक म्हणून, काम करेन शिवाय प्रत्येक भागातले सक्रिय कार्यकर्ते हे आमदार म्हणून तुमच्याकडे सतत कार्यशील राहतील याची ग्वाही आपण देतो असे विचार भाजपाचे अधिकृत उमेदवार हलगेकर यांनी व्यक्त केले. गुरुवारी सायंकाळी नंदगड येथे त्यांची भव्य प्रचार सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नंदगड येथील ज्येष्ठ व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते मोहन पाटील होते.

प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते विजय कामत यांनी केले. यावेळी प्रास्ताविक पर बोलताना माजी आमदार व भाजप नेते अरविंद पाटील म्हणाले, तालुक्यात भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आणणे हेच आपले ध्येय असून गेल्या पाच वर्षात तालुक्याला लुटलेल्या लोकप्रतिनिधींना त्यांचा घरचा रस्ता दाखवण्यासाठी व तालुक्यातून त्यांना हातभार करण्यासाठी आज राग, द्वेष, ईर्षा सर्व बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणाची निगडित राहून आपण काम करत आहोत. मी ही इच्छुक होतो पण उमेदवारी ही एकट्यालाच मिळते अशा परिस्थितीमध्ये भाजपच्या वरिष्ठांनी जेष्ठ असलेल्या विठ्ठल हलगेकर यांना उमेदवारी देऊन पुन्हा एकदा खानापूर तालुक्यात भाजपचा झेंडा रोवण्यासाठी संदेश दिला आहे.आणि त्याच अनुषंगाने वरिष्ठांच्या आज्ञेला मान देत खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार करण्यासाठी माझ्यासह अनेक इच्छुक नेतेमंडळी सर्वसामान्य कार्यकर्ते व तालुक्यातील जनता आतुरली आहे. त्यामुळे येत्या 10 तारखेच्या निवडणुकीत विरोधकांना धूळ चारण्यासाठी आपण भाजपच्या कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून आपला प्रतिनिधी विधानसभेत पाठवावा. तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तुम्ही, आम्ही जबाबदारी घेत या तालुक्यात एक विकासाची गंगा आपण आणूया आणि यासाठी समर्थन द्याल असा आशावाद व्यक्त केला.

बोलताना संजय कुबल यांनी देश, देव आणि धर्म या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची कार्य तत्परता आहे. देशाला समृद्ध बनवण्यासाठी नरेंद्र मोदीजी यांनी आखलेल्या योजना आज मार्गी लावण्यासाठी पुन्हा एकदा भाजपच्या पाठीशी जनते राहावे. खानापूर तालुक्यात रखडलेला विकास हा पूर्णत्वाला आणण्यासाठी विठ्ठल हलगेकर यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी काम करूया असे आवाहन केले.भाजपा प्रभारी उज्वला बडवानाचे यांनीही भाजप उमेदवार निवडीसाठी कशा पद्धतीने कार्य केले पाहिजेत. सरकारने आतापर्यंत राबवलेल्या योजना व त्याची अंमलबजावणी या संदर्भात जनतेला जागृत करून पुन्हा एकदा विकासाची आठवण करून भाजपच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनीही भारतीय जनता पार्टीची ध्येय तत्वे व विठ्ठल हलगेकर यांच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेत भाजपच्या पाठीशी सर्वांनी उपस्थित राहून तालुक्याचा प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी मोठे योगदान द्यावं व तालुक्यात न भूतो न भविष्यती असा विजय करण्यासाठी मतदाराने सजरावे असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस मधून नुकताच भाजपात प्रवेश केलेले राणी शुगरचे माजी चेअरमन मोहन संबर्गी लक्ष्मण झांजरे,लक्ष्मण बामणे, माझे अध्यक्ष विठ्ठल पाटील, माजी जि प सदस्य जोतिबा रेमाणी मंजुळा कापसे यासह अनेक भाजपाचे अनेक पदाधिकारी जेष्ठ नागरिक उपस्थित होते. या सभेला जवळपास दोन हजार वरून अधिक मतदार व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने सहभाग दर्शवला होता. यावेळी ग्रामस्थांनी सगळीकडे येतानाच भाजप उमेदवार विठ्ठल हलगेकर यांच्यावर पुष्पांजली करत जंगी स्वागत केले. कार्यक्रमात शेवटी मल्लाप्पा मारीहाल आभार मानले

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us