खानापूर प्रतिनिधी: लग्न समारंभ आटोपून घरी परत असताना रस्त्याच्या बाजूने चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून दुचाकी वरील दोन चोरट्यानी पोबारा केल्याची घटना गुरुवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास खानापूर तालुक्यातील इदलहोंड नजिक घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती की खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथील सिद्धाचीवाडी येथे नातेवाईकांच्या एका विवाह सोहळ्यात सहभागी होऊन सिंगिनकोप येथील जयश्री ज्योतिबा कुंभार व अन्य एक महिला रस्त्याच्या बाजूने चालत जात असताना पाठीमागून एका दुचाकी एक्टिवा वाहनावरील दोघांनी गळ्यातील गंठण हिसकावून पोबारा केला. दुचाकीवरून पोबारा करताना सदर चोरट्याचे हेल्मेट तेथेच पडले. पाठीमागून पाटलाग करण्यात आला. परंतु त्या एक्टिवाला नंबर प्लेट नसल्याने वाहनाची ओळख पटवणे अशक्य झाले. तातडीने जवळ असलेल्या काहींनी इदलहोंड परिसरात पाटलाग करून त्या चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु येथेच लपवून त्या चोरट्यानी आपला डाव साधला यामुळे सदर महिलेचे 6 तोळ्याचे गंठण मात्र त्या चोरट्याने लंपास केले. याबाबत इदलहोंड येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा कुंभार यांनी सदर महिलेला धीर देऊन खानापूर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यासाठी प्रेरित केले आहे.खानापुर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे.