भाजप नेत्यांवर शरसंधान : खानापुरात मुरलीधर पाटील हेच शिवसेनेचे उमेदवार
खानापूर: शिवसेनेने सीमाप्रश्नासाठी रक्त सांडले आहे. त्यामुळे आम्हाला सीमावासीयांच्या वेदनांची जाणिव आहे. हा भाग महाराष्ट्रात समाविष्ठ व्हावा, यासाठी शिवसेना आनि राष्ट्रवादी हे दोनच पक्ष संवेदनशील आहेत. बाकी कुणाला सीमावासीयां बाबत प्रेम नाही. सीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभागात शिवसेना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी ठामपणे उभी असून आताच्या निवडणुकीत मुरलीधर पाटील यांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्या, असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले.
म. ए. समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत संजय राऊत बोलत होते.
यावेळी त्यांनी भाजपवर शरसंधान साधले.
सीमाभागातील 20 लाख मराठी भाषिक महाराष्ट्रात जाण्यासाठी गेल्या 66 वर्षांपासून धडपडत आहेत. शिवसेनेने वेळोवेळी सीमाप्रश्नावरून रान उठविले आहे. त्यासाठी सेनेने 69 हुतात्मे दिले आहेत. त्यामुळे दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा करतांना आमच्या छातीत कळ येते. आमचे सीमाबांधव कर्नाटकात खितपत पडल्याचे दुःख होते. मात्र, निवडणुकांमध्ये भाजपचे नेते निर्धास्तपणे सीमावासीयांच्या जखमेवर मिठ चोळत त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करतात
शिवसेनेचे के. पी. पाटील यांची हकालपट्टी
सीमाभागात शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र एकीकरण समिती आणि समिती म्हणजेच सेना असे आम्ही समजतो, परिस्थितीनुसार शिवसेनेने के. पी. पाटील यांना एबी फॉर्म दिला होता. पण समितीच्या लढायला जाणून त्यांना पक्षाने माघार घेण्यास सांगतले होते. पण, त्यांनी आडमुठेपणा केला असून त्यांची पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी हकालपट्टी केली आहे. त्यांचा सेनेशी कोणताही संबंध नाही. मराठी भाषिकांनी त्यांना मतदान न करता मुरलीधर पाटील यांना करावे, असे आवाहन खा. संजय राऊत यांनी केले.
समिती सेना एकत्र आल्यामुळे बळ
यावेळी बोलतांना उमेदवार मुरलीधर पाटील म्हणाले, यावेळी तालुक्यातील मराठी जनता समितीच्या पाठीशी असल्याने विजय निश्चित आहे. समिती सेना एकत्र आल्यामुळे आमचे बळ वाढले असून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. मराठी भाषिकांनी मराठी अस्मिता जपण्यासाठी समितीला मतदान करावे. व्यासपिठावर म. ए. समिती आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते.. प्रारंभी येथील शिवस्मारक चौघात खासदार संजय राऊत यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले छत्रपती शिवरायांना अभिवादन केल्यानंतर खानापूर शहरातून त्यांची अर्बन बँक चौकापर्यंत भव्य रोड शो झाला. व जाहीर सभा झाली या सभेला हजारो मराठी भाषिक उपस्थित होते.