लोंडा:
खानापूर तालुक्यात निधर्मी जनता दलाचे अधिकृत उमेदवार नाशीर बागवान यांची प्रचार यंत्रणा जोरात सुरू झाली आहे. खानापूर तालुक्याच्या अनेक भागांमध्ये नासिर बागवान यांनी आपल्या प्रचाराला जोर लावला आहे. दोन दिवसापूर्वी लोंढा भागामध्ये त्यांची भव्य रॅली झाली. त्याप्रमाणे गुंजी संगरगाळी, कापोली आदी भागांमध्ये घरोघरी जाऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला.
यावेळी त्यांचे जेष्ठ चिरंजीव रईससाब बागवान यांनीही प्रचारात सक्रीय भाग घेतला आहे. त्यामुळे मतदारात एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. रइससाब बागवान यांनी युवकांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी अनेक युवकांच्या मिळून मिसळून त्यांनी मतदारांना मत याचना करत आहेत.
गुंजी, संगरगाळी भागात झालेल्या या वेळी वासुदेव तळवार, प्रवीण संगरगाळी परसराम मादार आधी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला असून सर्व भागातून नासिर भगवान यांना वाढता पाठिंबा दिसत आहे