खानापूर/ प्रतिनिधी :
खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ विविध विभागातील कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. महिला मोर्चाच्या वतीने तालुक्यातील अनेक गावात कोपरा बैठका घेऊन महिलांना जागृत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भाजप नेत्या व माजी तालुका पंचायत अध्यक्ष राजश्री देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश महिला नेत्या सुवर्णा पाटील, भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य धनश्री सरदेसाई माझी तापा सदस्य वासंती बडगेर यांनी गावागावात प्रचार दौरा प्रारंभ केला आहे. मंगळवारी काटगाळी येथे एक कोपरासभा बैठक पार पडली.
यावेळी मतदारांना मार्गदर्शन करताना माझी तापा अध्यक्ष राजश्री देसाई म्हणाल्या, भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे तालुक्यातील मतदार एक संघ झाले आहेत. आता काटगाळी भागातील मतदारानी ही भाजपच्या पाठीशी एकसंघ राहून यावेळी भारतीय जनता पार्टीचा आमदार खानापूर तालुक्यात करण्यासाठी साथ द्यावी. खानापूर तालुक्यातील भूमिपुत्राला आमदार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे तालुक्यातील अनेक नेतेमंडळी आज एकवटले आहेत. त्यामुळे यावेळी खानापुरात भाजपाचा विजय निश्चित असून आता केवळ मताधिक्य घेण्यासाठी प्रत्येकाचे मत हे मौलाचे आहे असे विचार व्यक्त केले. यावेळी तालुका पंचायत माजी उपसभापती व राज्य व निगमचे संचालक सुरेश देसाई, महाराष्ट्र प्रदेश भाजप नेत्या सुवर्णा पाटील, भाजपा राज्य कार्यकारणी महिला सचिव धनश्री सरदेसाई, माजी ता.प सदस्य वासंती बडगेर यासह अनेक भाजपा महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. यावेळी काटगाडी गावातील मतदारांनी भाजपला एक मुखी पाठिंबा दर्शविला. यावेळी गावातील अनेक महिला प्रतिनिधी पंच कमिटी उपस्थित होत्या.