रुमेवाडी येथील नव्यानेच जिर्णोद्धार केलेल्या श्री मरेव्वा मंदिराचा दि. २७/०१/२०२३ रोजी उदघाटन समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला.
तत्पूर्वी बुधवारी गावात सवाद्य देवीची मिरवणूक काढण्यात येवून त्यानंतर मंदिरात वास्तु,नवग्रहमंडळ पुजन करण्यात आले. गुरूवारी मुर्ती प्रतिष्ठापना, पुजा व महाआरती करण्यात आली.
आजचा उदघाटन कार्यक्रम निवडणूकीची धांदल असूनही कोणत्याही राजकीय पुढारी मंडळींना पाचारण न करता संपन्न झाला हे विशेष होते.
कार्यक्रमाची सुरुवात गावातील महिला मंडळाच्या स्वागत गीताने झाली. अध्यक्ष म्हणून श्री बहिर्जी लक्ष्मण चौगुले, मंदिराचे उद्घाटक श्री बबन यशंवत अल्लोळकर, मुर्ती पुजन श्री रावजी गंगाराम चौगुले तसेच दिपप्रज्वलनास श्री महेश हल्याळकर, महेश घाडी, विलास बेडरे , प्रमुख पाहुणे श्री विठ्ठल शिंदे,श्री बुदाप्पा चौगुले,श्री बाळकृष्ण घाडी,श्री महादेव ल.चौगुले,श्री जयवंत चौगले,श्री टोपाण्णा साळूंखे,श्री महादेव ल.घाडी,श्री निळू बेडरे,श्री मारूती शिंदे,श्री नागेश घाडी,श्री हणमंत शिंदे तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी आर्ट ऑफ लिविंग योग शिक्षिका स्मिता चौगुले यांनी 'योग ध्यान आणि आपलं शरीर'याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री सिताराम बेडरे यांनी केले. या मंदिर उभारणीस गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत करून हातभार लावला.त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री महादेव शिंदे,श्री परशराम बैलूरकर,श्री जोतीबा चौगुले, श्री हणमंत बेडरे,श्री विठ्ठल घाडी,श्री तुळराम गुंडपीकर यांनी बरेच परिश्रम घेतले. दुपारी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.