oplus_4195328

oplus_4195328

खानापूर /प्रतिनिधी:

जीवन हे समृद्ध आहे यशाची गुरुकिल्ली शोधण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्म व नियमितता कायम ठेवली पाहिजे. जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी मनन, चिंतन आणि सातत्य कायम राखले तर यशाची गुरुकिल्ली नक्कीच. यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षेचे ध्येय समोर ठेवून अभ्यास वृत्ती जपावी व नेहमी सातत्य राखावे असे पुनर्विचार ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संस्थापक विशारद, तथा अधिवक्ते पीटर डिसोजा यांनी व्यक्त केले.

खानापूर येथे ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी ज्ञानवर्धिनी व्याख्यानमाला सांगता सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

oplus_4195328

गेल्या 17 वर्षात ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. यावर्षीही पुरस्कार वितरण करण्यात आले. यामध्ये जीवनगौरव पुरस्कार गुरुवर्य परशुराम नंदीहळी (माजी आमदार) यांना देऊन गौरविण्यात आले. तर ज्ञानवर्धिनी ज्ञानरत्न पुरस्कार नागुर्डा प्राथमिक शाळेच्या शिक्षिका स्नेहा कृष्णाजी देसाई यांना देण्यात आला. समाज सेवा गौरव पुरस्कार नंदगड ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष यल्लाप्पा गुरव यांना समाजसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ज्ञानवर्धिनी गौरव पुरस्कार माचिगड येथील सुब्रमण्यम साहित्य अकादमी व खानापूर येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानला मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शिवाजीराव जळगेकर यांचाही त्यांच्या उत्तुंग शैक्षणिक विषयाबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्रश्नपत्रिका संचिकेचे प्रकाशन : येत्या दहावी परीक्षेत विद्यार्थ्यांना अभ्यास सुलभ जावा यासाठी तज्ञ शिक्षकांच्या कडून संभाव्य प्रश्नपत्रिका संचिका तयार करण्यात आली आहे या प्रश्नपत्रिका संचिकेचे प्रकाशन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

oplus_6292480


2025 मधील दहावी वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन व निवृत्त झालेल्या व व्याख्यानमालेच्या वेळी रिसोर्स पर्सन या नात्याने सेवा बजावणाऱ्या शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व इशस्तवनाने झाली.

oplus_2098176


कार्यक्रमाला अतिथी म्हणून डी. पी वागळे, प्रा शरयू कदम, भोजराज पाटील, पुंडलिक पेडणेकर, बी एस नावी, एस आर पाटील, डॉ. शुभांगी जकाती, सी के पाटील, नामदेव पाखरे, आधी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रस्तावना बी.जे बेळगावकर यांनी केली. तर आभार व्ही बी होसूर यांनी मांडले. सूत्रसंचालन निवृत्त शिक्षक संजीव वाटुपकर मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी केले.

oplus_2098176

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us