खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: खानापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध व कदंबकालीन राजधानी असलेल्या हलशी (ता. खानापूर) येथील श्री.महालक्ष्मी यात्रा फेब्रुवारी 2026 रोजी करण्याचे निश्चित झाले आहे. परंपरेप्रमाणे यात्रेनिमित्त वर्षभर आधी लक्ष्मी देवीला रेडा सोडण्याचा विधी केला जातो. मंगळवार दि. 6 रोजी प्रथेनुसार हलशी मंदिरासमोर हा विधी दुपारी 3 वा. पार पडणार आहे.
यानिमित्ताने येथील पौराणिक नृसिंह- वराह मंदिरात गाऱ्हाणे उतरविण्यात आल्यानंतर रेड्याची मिरवणूक लक्ष्मी मंदिरापासून सुरु होणार आहे. यानंतर थळदेव हलशीवाडी थडेदेव, म्हारताळ देव आदी देवतांना भेटी दिल्या नंतर घरोघरी रेड्याचे पूजन होणार आहे. या निमित्त 22 एप्रिलपासून मंगळवार व शुक्रवार वार पाळणूक करण्यात आली होती. आता मंगळवारी पाचव्या वारा दिवशी हा रेडा सोडण्याचा विधी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात