चापगाव: प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील श्री रामलिंगेश्वर देवाची यात्रा दरवर्षी महाशिवरात्रीला साजरी केली जाते. या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रविवार दि. 19 रोजी दुपारी तीन वाजता खळ्याच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्ती मैदानात आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.तरी कुस्ती पैलवान आणि शौकीनानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन व ग्रामस्थ कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.