हारुरी:
मौजे हारुरी ता. खानापूर येथ रविवार दि. 19 फेब्रुवारी रोजी श्री राजा शिव छत्रपती युवक मंडळ हारुरी यांच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ठीक 7:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिषेक सोहळ्याने कर्यामाची सुरुवात झाली.उपस्थित सर्वांनी प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र,शिवाजी महाराजांची आरती गायन केले.नंतर गावकरी भगिनींनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पाळण्यात घालून पाळणा गीते गाण्यात आली.नंतर गावातील भजनी मंडळाच्या वतीने गावात पालखी सोहळा व मिरवणूक काढण्यात आली.
कार्यक्रमाला श्री राजा शिव छत्रपती युवक मंडळाचे कार्यकर्ते,गावातील बालगोपाळ, बंधुभगिनी,ज्येष्ठ नागरिक, शेडेगाळी व ढोकेगाळी येथील मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.अशा रीतीने शिव जयंती सोहळा मोठा उत्साहात पार पडला.