खानापूर :खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकारण समितीचे माजी अध्यक्ष व माजी जिल्हा पंचायत सदस्य विलास कृष्णाजी बेळगावकर यांचा 61 वा वाढदिवस शुक्रवारी उत्साहात पार पडला.
यानिमित्ताने खानापूर येथील शासकीय रुग्णालयात फळे वाटप करण्यात आली. त्याचप्रमाणे सकाळपासून त्यांच्यावर तळागाळातील तमाम मराठी भाषिकासह हितचिंतक मित्रपरिवारातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दुपारी खानापूर येथील जांबोटी मल्टी. सोसायटीच्या वतीने त्यांचा सर्वोदय सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी संचालक यशवंत पाटील विद्यानंद बनोसी मनोहर डांगे पांडुरंग नाईक कर्मचारी दिलीप होनुरकर, सूर्यकांत बाबसेट आदी उपस्थित होते
श्रीमान विलास बेळगावकर हे खानापूर तालुक्यातील एक प्रभावी व निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जाते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून गेल्या 25 ते 30 वर्षापासून ते अविरतपणे एक निष्ठेने समितीची सेवा करत आले आहेत.त्यांनी 1988 ते 1992 या कालावधीत त्यांनी जिल्हा पंचायत सदस्य म्हणून जांबोटी भागात निवडून आले. व मराठी भाषा व संस्कृतीसाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. महाराष्ट्र एकिकरण समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना देखील एक चांगली फळी त्यांनी तालुक्यात संघटना उभा केली. सोसायटीच्या वतीने दुर्गम भागातील गोरगरिबांना आर्थिक व्यवस्था करण्यासाठी 1995 साली जांबोटी मल्टी. सोसायटीची स्थापना करून या सोसायटीला अनेक ग्राहक जोडून समाजसेवा ती दिली आहे 2018 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढवली. पण बंडखोरीच्या अंतर्गत वादामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. पण त्यांनी समितीची निष्ठा व कार्य कधीच थांबवली नाही. त्यामुळे आगामी काळात त्यांच्याकडे भावी नेतृत्व म्हणून देखील सर्वसामान जनतेतून पाहिले जाते. अशा श्रीमान विलास बेळगावकर यांनी आज 60 वर्षे पूर्ण करून 61 व्या पदार्पण पदार्पण करत आहेत. त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व त्यांना शताआयुष्य लाभो हीच सदिच्छा
संपादक: पिराजी कुऱ्हाडे