IMG-20230218-WA0202


तोपिनकट्टी श्री महादेव मंदिरात अभिषेक
रविवारी दुपारी महाप्रसादाचे आयोजन

तोपिनकट्टी : संपूर्ण विश्वाचा निर्माता व देवांचा देव भगवान महादेव याला अनन्य महत्त्व आहे. शिवाची आराधना ही विश्वातील सर्वात मोठी आराधना मानली जाते. तिन्ही लोकात देव आणि दानव यांच्यात सृष्टी निर्माण करताना घडलेल्या गोष्टी तपश्चर्य, या सर्व पुरातन काळातील गोष्टी आपण ऐकले आहेत. दैवतावर विश्वास ठेवून जगण्याची भारतीय संस्कृती व रितीरिवाज आहे. आपण सगळे मूर्ती पूजक आहोत म्हणून मूर्तीला पूजन त्यात देव मारण्याचे समाधान आम्हा भारतीयांमध्ये आहे.त्यामुळेच धर्म रितीरिवाजाप्रमाणे चालणारे धार्मिक उत्सव देवांची आराधना हीच मानवी जीवनाचे समाधान मानले जाते.यासाठीच प्रत्येक धार्मिक उत्सवात भक्ती भाव निर्माण केला जातो. त्याचप्रमाणे महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने तोपीनकट्टी श्री महादेव मंदिरातील हा कार्यक्रम या गावातील एक प्रमुख सण असल्याचे विचार महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले.

शनिवारी सायंकाळी येथील श्री महादेव मंदिरात अभिषेक व पुजाराच्या कार्यक्रम झाल्यानंतर आयोजित मराठमोळ्या सांस्कृतिक कार्यक्रमास उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्ष या नात्याने बोलत होते.

मो

शिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सकाळपासून मंदिरात भजन पुजारीच्या झाली. शनिवारी सायंकाळी सात वाजता सौ रूक्मिणी व श्री विठ्ठल सोमांना हलगेकर या दांपत्याच्या हस्ते श्री महादेव मंदिर मध्ये होमहवन व अभिषेक कार्यक्रम संपन्न झाला. तर सामूहिक महाआरती होऊन या शिवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने गावातील वारकरी मंडळीचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. या उत्सवाच्या निमित्ताने रविवार दिनांक 19 रोजी सकाळी पूजा अर्ज व भजनाचा कार्यक्रम त्यानंतर महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होणार आहे

पाटील क्रिएशन प्रस्तुत वेढ घुंगराच मराठमोळा कार्यक्रम

या उत्सवाच्या निमित्ताने शनिवारी रात्री 10 वाजता पाटील क्रिएशन प्रस्तुत रिया पाटील यांचा बहारदार
वेड घुंगरांचं असा मराठमोळा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत सदस्य व खानापूर पिकेपीएसचे चेअरमन नारायण कार्वेकर, तोपिनकट्टी ग्रामपंचायत चे उपाध्यक्ष रघुनाथ व्यं, फाटके, ग्राम पंचायत सदस्य मारुती क. गुरव, आदींच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व भाजप नेते विठ्ठल हलगेकर होते.
कार्यक्रमात दीप प्रज्वलन विविध दैवतांच्या प्रतिमांचे पूजन ग्रामपंचायत अध्यक्ष सौ. लक्ष्मी भ, तिरवीर, सदस्य सौ. गीता आ. हलगेकर, सदस्या, पा : श्री. शिवाजी म. करंबळकर श्री. चत्राप्पा क. गुरव, श्री. लक्ष्मण व तिरवीर, सौ. अनिता प्र. मुरगोड,सौ. पारव्या मा. हुडे, रेणुका सु. कोलकार, सौ. रेखा वि. सुतार, सदस्या, ग्रा. पं. तोपिनकटी चांगाप्पा निलजकर, सदानंद होसूरकर,भरमाणी प्र. पाटील, शंकर बा. पाटील, प्रकाश क. तिरवीर, निवृत्ती पातील, विठ्ठल म. करंबळकर, सोमनाथ य. तिरवीर, राजाराम वि. हलगेकर, राजू सिद्धाणी, मल्लेशी आ. खांबले, यल्लाप्पा म. तिरवीर, परशराम सो तिरवीर, एसडीएमसी अध्यक्ष, अशोक है. करवळकर, रामकृष्ण पां. बांदिवडेकर, नागेश गं. जोगोजी, तुकाराम धु. हुंदरे, बाळगोंडा य. पाटील, ईराप्पा मु. पाटील, बळीराम ह. पाटील, अरुण प. काकतकर, विनायक म. पाटील, हणमंत खांबले, विलास तळवार, सिद्ध कोलकार आदी उपस्थित हो
ते

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us